मधल्या वेळचे पदार्थ मुख्यपान

आवळा कॅन्डी

साहित्य - १ किलो आवळे, ७५० ग्र. साखर, पीठी साखर

कृती - चांगले निवडलेले आवळे स्वच्छ धुवून, पुसून, पाणी न घालता बंद डब्यात भरावे. आता हा डबा कुकरमध्ये ठेवून ३-४ शिटट्या होऊ द्याव्यात. पूर्णपणे गार झाल्यावर आता आवळ्याच्या पाकळ्या सहजपणे वेगळ्या करता येतील. बी काढून टाकून सर्व आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करुन घ्याव्या. हे आवळे भांडयात काढून त्यावर साखर पेरावी अश्या त-हेने आवळे पूर्णपणे साखरेने झाकले जातील. आता हे भांडे उन्हात ठेवावे. आठ तासांनी साखरेचा पूर्णपणे पाक झाला असेल. हे भांडे पुढील दोन दिवस उन्हातच राहू द्यावेत. तिस-या दिवशी आवळे पूर्णपणे पाकाच्या तळाशी जातील. आता चाळणीवर हा पाक गाळून घ्यावा. वर उरलेल्या कॅन्डी उन्हात अजून २-३ दिवस वाळवायला ठेवाव्यात. पूर्णपणे वाळल्यावर अधिक गोड हवी असल्यास कॅन्डीवर पिठी साखर चोळावी. वाळलेल्या कॅन्डी बंद डब्यात भराव्यात. उरलेला पाक हा आवळा सरबत म्हणून उपयोगात आणता येतो. पाक बाटलीत भरुन, फ्रीज मध्ये ठेवावा. सरबत प्यायच्या वेळेला एक ग्लास पाण्यात २-३ चम्मचे पाक मिसळल्यास आवळा सरबत तयार.

- भाग्यश्री केंगे
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

खजुराची बर्फी

साहित्य - १०० ग्रॅम खजूर, ५० ग्रॅम खोबरा किस, अक्रोड व काजूचे तुकडे, विलायची पूड.

कृती - खजूराच्या बी काढून बारीक तुकडे करणे, कुकरमध्ये एका उभ्या बंद स्टीलच्या डब्यात हे तुकडे घालून २ शिट्या होऊ द्याव्या. कुकर थंड झाल्यावर त्या तुकडयांमध्ये इतर साहित्य घालावे व मिश्रण चांगले एकजीव करून त्याचा रोल करावा. हा रोल अर्धा तास फ्रिजमध्ये ठेऊन नंतर सुरीने हव्या तश्या वडया कापाव्या.

याची चव चॉकलेटसारखी लागते, त्यामुळे मुलांना चॉकलेट ऐवजी ही सात्वीक बर्फी देऊ शकतो.

पोळीचा लाडू

साहित्य - आदल्या दिवशीच्या किंवा सकाळच्या पोळ्या आवडीनुसार गुळ किंवा साखर आश्यकतेनुसार साजूक तूप.

कृती - आपल्या आवडीनुसार पोळ्या हाताने कुस्करुन किंवा मिक्सर मधून बारीक करुन घ्या. मिक्सरवर पोळ्या अधिक बारीक होतात. त्यात साखर किंवा बारीक चिरलेला गुळ मिसळून घ्यावा. लाडू वळले जातील इतके साजूक तूप त्याच्यात मिसळावे व लाडू वळावे. आवडत असल्यास ह्या लाडूत मनुका, काजू, बदामाचे कापही घालू शकता.

- भाग्यश्री केंगे
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF