मुखशुध्दी मुख्यपान

आवळा सुपारी


साहित्य - २५० ग्रॅम डोंगरी आवळे, अर्धा चमचा काळया मिर्‍यांची पूड, अर्धा चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, २ लिंबाचा रस.

कृती - मोठे डोंगरी आवळे धुवून, पुसून स्टीनलेस रूटीलच्या किसणीवर किसून घ्यावेत. (साध्या किसणीवर किसल्यास आवळे काळे पडतात) नंतर त्यात मीठ, मिरेपूड, जिरेपूड घालून कालवावे. नंतर त्यावर २ लिंबाचा रस घालावा आणि हा कीस उन्हात वाळत घालावा. ही सुपारी पाचक असून उपासाला चालते आणि मुलांना देखील फार आवडते.

मसाला सुपारी


साहित्य - पाव किलो भरडी सुपारी, १२५ ग्रॅम चिकणी सुपारी, ८ ते १० लवंगा, ८ ते १० वेलदोडे, ४ चमचा खसखस, पाव जायफळ, १ वाटी खोबरे कीस, १ चमचा ज्येष्ठमध पूड, २ चहाचे चमचे साजूक तूप.

कृती - खोबरे किसून भाजून घ्यावे व चुरावे, बडीशेप खसखस भाजून घ्यावी. सुपारी कुटून घ्यावी. लंवग, वेलदोडयाची पूड करून घ्यावी. तुपावर काढलेली सुपारी गरम करून जरा परतून घ्यावी. लालसर झाली की उतरवावी. नंतर बाकीचे सर्व पदार्थ घालून चांगली कालवावी. नंतर गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरावी. मसाला सुपारी बरेच दिवस टिकते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF