उपवासाचे पदार्थ मुख्यपान

भगरीचीभाकरी


साहित्य - भगर दळून आणावी, भिजवण्यासाठी पाणी, चवीपुरते मीठ

कृती - चवी पुरते मीठ घालून भगरीचेपीठ भिजवावे. थोडे पीठ भुरभुरुन भाकरी थापावी. तव्यावर नेहमी भाकरी भाजतो तशी भाजावी. भाकरी करतांना तव्यावर टाकल्या वर पाणी लावतात तेही लावावे. उलटली की मोठ्या आचेवर भाजावी. ही भाकरी बटाटा उकडून तुपाची फोडणी जिरे घालून केलेल्या भाजी सोबत उपासाला चालते.

भगर थंड गुणधर्माची आहे. नवरात्रात महिला उपास करतात तेव्हा पटकन आणि पोटभरीची होणारी आहे. ह्यामुळे साबुदाणाही टाळता येतो.

शिंगाडयाच्या पिठाच्या चकल्या


साहित्य - शिंगाडयाचे पीठ १ वाटी, नाचणीचे पीठ पाव वाटी, भिजवलेला साबुदाणा १ वाटी, उकडलेल्या बटाटयाचा किस १ वाटी, जिरे १ चमचा, मिरची पावडर पाव चमचा, साखर, चवीपुरतं मीठ.

कृती - शिगांडा, नाचणीचं पीठ, साबूदाणा, बटाब्याचा किस, भाजलेले जिरे १ चमचा, तिखट, मीठ, साखर सगळं एकत्र करून कोमट पाण्यात भिजवून चांगले मळावे. त्याच्या लहान लहान चकल्या पाडाव्यात. उन्हात चांगल्या वाळवून ठेवाव्यात. गरज पडेल तेव्हा तळून खाव्यात. वाळवलेल्या चकल्या हवाबंद डब्यात ठेवल्यास खूप दिवस टिकतात.

वर्‍याच्या तांदुळाचे थालीपीठ


साहित्य - वर्‍याच्या तांदुळ बुडतील इतक्या पाण्यात ४-५ तास भिजत घालावे नंतर बारीक वाटावे. वाटतांना त्यात जिरे व मीठ घालावे. नंतर दाण्याचे कूट व कच्च्या बटाटयाचा किस घालावा. हे पदार्थ एकत्र मिसळावेत. त्यात जरूरीएवढे पाणी घालून मळून थालीपीठ लावावे किंवा अधिक पाणी घालून धिरडे पसरावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF