मुखशुध्दी मुख्यपान

बिब्याची सुपारी


साहित्य - १०० ग्रॅम चिकणी सुपारी, २५० ग्रँम भरडी सुपारी, ५ ग्रॅम लवंगा, १ मध्यम वाटी सुके खोबरे, १ जायफळ, ३-४ बिब्बे, पाव चमचा मीठ, १ चमचा बडीशेप, ४-५ चहाचे चमचे तूप.

कृती - भरडी सुपारी आदल्या दिवशी तुकडे करून १५ ते २० मिनिटे पाण्यात घालून ठेवावी. नंतर ती कपडयावर पसरून वाळवावी. जायफळाची कुटून बारीक पूड करावी. बडीशेप व लवंगा भाजून घेऊन त्यांची बारीक पुड करावी. चिकणी सुपारी कातरून वेगळी ठेवावी. बिब्बेही अडकित्याने फोडून, काचर्‍या करून ठेवावेत. खोबर्‍याचे बारीक काप करावेत. तुपावर दोन्ही सुपार्‍या वेगवेगळया परतून घ्याव्यात. नंतर थोडया तुपावर खोबर्‍याचे काप परतून घ्यावेत व शेवटी थोडया तुपावर बिब्याच्या काचर्‍या परतून घ्याव्यात, नंतर हलक्या हाताने ह्या वस्तू जाडसर कुटून घ्याव्यात, नंतर त्यात जायफळपूड, लवंगपूड, बडीशेप भाजून केलेली पूड व मीठ घालून सर्व एकत्र कालवावे.

तीळ ओव्याची सुपारी


साहित्य - २५० ग्रॅम बडीशेप, २५० ग्रॅम पांढरे तीळ, २५० ग्रॅम बाळंतशोपा, २५० ग्रॅम धन्याची डाळ, १०० ग्रॅम ओवा.

कृती - ओवा पाण्यात धुवून घ्याव्यात व कपडयावर पसरून उन्हात वाळवाव्यात, वाळल्यावर चांगल्या चोळून घ्याव्यात व भरड कुटून घ्यावा, वरील साहित्यातील बाकीच्या सर्व पदार्थाना मीठ, हळद व थोडे पाणी चोळून ठेवावे व उन्हात वाळवावे. उन्हातून आणल्यावर लगेचच भाजावे. त्यात कुटलेल्या ओवा मिसळाव्यात. सर्व गार झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF