मधल्या वेळचे पदार्थ मुख्यपान

हेल्दी ब्रेड पिझ्झा

साहित्य -
४ गव्हाच्या ब्रेडचे स्लाईस,
१/२ कप कांद्याच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप टोमॅटोच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप ढोबळी मिरचीच्या गोल बारीक चकत्या
१/२ कप बारीक किसलेला कोबी, गाजर, बीट (कमी प्रमाणात)
१/२ कप किसलेले पनीर (ऐच्छीक)
पाऊण कप किसलेले चीज
एक मूठ मोड आलेले हिरवे मूग 
टोमॅटो सॉस, तिखट, मीठ

कृती -
१) टोमॅटो सॉसमध्ये आवडीनुसार मीठ व तिखट घालून वाटीमध्ये वेगळे मिसळून ठेवा.
२) आईच्या मदतीने ओव्हन योग्य तापमानावर प्रिहीट करायला ठेवा.
३) आता ब्रेडच्या स्लाईसवर तयार केलेले सॉस पसरवा.
४) त्यावर किसलेला कोबी, गाजर, बीट आणि मोड आलेल्या मूगाचा एक थर द्या.
५) त्यानंतर आपल्याला आवडतील त्याप्रमाणे कांदा, टोमॅटो, मिरचीच्या चकत्या ठेवा.
६) आवडीनुसार पनीर आणि चीज किसून घाला.
७) लगेचच ओव्हनमध्ये बेक करायला ठेवा. चीज किंचीत वितळले / 
सोनेरी झाले की गरमागरम सर्व्ह करा.

टीप -
भाज्या घालून झाल्यावर ब्रेड लगेचच ओव्हनमध्ये ठेवावा.
आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते.

- भाग्यश्री केंगे
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF