केक मुख्यपान

डेट अँड वॉलनट केक


साहित्य - १०० ग्रॅम मैदा, १/४ टी. स्पून सोडा (१/८+ १/८), १ टी. स्पून बेकींग पावडर, १३० ग्रॅम मिल्कमेड, ६०-७० ग्रॅम मार्गरिन, १ टी.स्पून व्हॅनिला इसेन्स, ५० मि.ली. दूध, ७५ मि.ली. पाणी, १३० ग्रॅम सीडलेस खजूर, ४० ग्रॅम तुकडा आक्रोड.

कृती -

१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.

२) केकच्या टीनला तळाला व बाजूने मार्गरिन लावून मध्यभागी एक बटरपेपरचा छोटा चौकोनी तुकडा लावावा. नंतर टीनमध्ये मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूने लागेल असे पहावे.

३) खजूर बारीक चिरून त्यात पाणी घालावे. १/८ सोडा त्यात घालावा. पाणी आटेपर्यंत खजूर गॅसवर शिजवावा.

४) मैदा, बेकिंग पावडर व १/८ सोडा पिठाच्या चाळणीने ३ वेळा चाळून झाकून ठेवावा.

५) मिल्कमेड व मार्गरिन फेटून घ्यावे.इलेक्ट्रीक बीटरने फेटल्यास उत्तम.

६) नंतर त्यात चाळलेला मैदा थोडा थोडा घालत फेटावे. नंतर त्यात दूध घालावे. शिजलेला खजूर व आक्रोडाचे तुकडे घालून परत फेटावे.

७) तयार मिश्रण टीनमध्ये घालून ओव्हनमध्ये ठेवावे. साधारणपणे १८-२० मिनाटे बेक करावे.

८) साधारण २० मिनीटानी सुरी किंवा विणकामाच्या सुई केकमध्ये घातली असता ती स्वच्छ बाहेर आली  म्हणचे केक तयार झाला असे समजावे.

९) केक तयार झाल्यावर सर्व बाजूनी सुरी फिरवून कडा सोडवून ध्याव्यात. तारेच्या जाळीवर टीन उपडा करावा. जाळीवर केक काढल्याने केकला दोन्ही बाजूनी हवा लागते. थंड झाल्यावर तुकडे कापावेत.

आदिती पातकर


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF