केक मुख्यपान

पाऊंड केक


साहित्य - अंडी 4 (वजन अंदाजे 200 ग्रॅम), मैदा 200 ग्रॅम, बेकींग पावडर 1 सपाट टीस्पून, चिमूटभर मीठ, साखर 200 ग्रॅम, मार्गरिन 200 ग्रॅम, व्हॅनिला इसेन्स 1 टीस्पून

कृती -
1) ओव्हन चालू करून 180 अंशावर तापवावा.

2) केकच्या टीनला तळाला व बाजूने मार्गरिन लावून मध्यभागी एक बटरपेपरचा छोटा चौकोनी तुकडा लावावा.नंतर टीनमध्ये मैदा भुरभुरावा.मैदा टीनला सर्व बाजूने लागेल असे पहावे.

3) मैदा, बेकींग पावडर व मीठ एकत्र करुन तीनदा चाळून घ्यावा.

4) अंडी, मार्गरिन व साखर ह डमिक्सर किंवा इलेक्ट्रीक बीटर किंवा मिक्सर वापरुन साधारणपणे साखर विरघळेपर्यंत फेटावे. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा.

5) ह्या मिश्रणात चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पावडर हळूहळू घालत एका दिशेने गोलाकार मिश्रण फेटावे म्हणजे गुठळया होणार नाहीत. मैदा घातल्यानंतर मिक्सर वापरू नये. हाताने लाकडी किंवा प्लॅस्टीकचा चमचा वापरून मिश्रण फेटावे.

6) हे तयार मिश्रण टीनमध्ये घालावे.

7) साधारण 20 मिनीटानी सुरी किंवा विणकामाच्या सुई केकमध्ये घातली असता ती स्वच्छ बाहेर आली म्हणचे केक तयार झाला असे समजावे.

8) केक तयार झाल्यावर सर्व बाजूनी सुरी फिरवून कडा सोडवून ध्याव्यात. तारेच्या जाळीवर टीन उपडा करावा. जाळीवर केक काढल्याने केकला दोन्ही बाजूनी हवा लागते. थंड झाल्यावर तुकडे कापावेत.

आदिती पातकर


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF