केक मुख्यपान

अ‍ॅपल केक


साहित्य - ३ मध्यम सफरचंद, पाणी ३ टीस्पून, मैदा २५० ग्रॅम, कोको पावडर १ टीस्पून, बेकींग पावडर १/४टीस्पून, सोडा १/२ टीस्पून, मीठ १/४ टीस्पून, लवंग, दालचिनी, जायफळ पूड (सर्व मिळून १ टीस्पून), अंडी २, मार्गरिन १२५ ग्रॅम, साखर १८० ग्रॅम, किसमिस ५० ग्रॅम

कृती -
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.

२) मैदा व बेकिंग पावडर,कोको पावडर एकत्र करून चाळून झाकून ठेवावे.

३) सफरचंद धुवून मधला बिया व दांडा काढून घ्यावा. सफरचंदाचे ८ तुकडे करावे. त्यात पाणी घालून नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये घालून घुसळून घ्यावे.

४) त्यात अंडी, मार्गरिन व साखर घालून घुसळून घ्यावे.

५) केकच्या टीनला तळाला व बाजूला लोणी लावून त्यात मध्यभागी बटरपेपरचा तुकडा लावावा.त्यावर थोडा मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूनी लागला पाहिजे.

६) तयार मिश्रण टीनमध्ये घालून तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये १८-२० मिनीटे भाजावे.

७) केकच्या मध्यभागी सुरी घालून केक तयार झाला आहे का ते पहावे. केकचे मिश्रण सुरीला न चिकटल्यास केक तयार झाला असे समजावे.

८) केक जाळीवर काढून थंड होऊ द्यावा.

९) हा केक पार्टीकरिता अगदी उत्तम आहे. २-३ दिवस आधी केला तरी चालतो. हवे असल्यास चॉकलेट सॉस वरून घालावा.

आदिती पातकर


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF