मधल्या वेळचे पदार्थ मुख्यपान

चटकदार व्हिटॅमीन भेळ

साहित्य - १ कप बटाटे - उकडून, साले काढून आणि फोडी करुन
१/२ कप उकडलेले कॉर्न (मका दाणे )
१/२ कप डाळिंबाचे दाणे
१/२ कप बारीक कापलेल्या सफरचंदाच्या फोडी
१/२ कप बारीक कापलेल्या संत्र्याच्या फोडी
१/४ कप उकडलेले शेंगदाणे
१/४ कप किसलेले गाजर
२ कप कुरमुरे
१ कप शेव
१/२ कप खजूर-चिंचेची चटणी (आईने केलेली)
२ टेबल स्पून हिरवी चटणी (आईने केलेली)
मीठ चवीनुसार

कृती -
१. वरील सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित कालवून घ्या.
२. लगेचच खायला घ्या.

- भाग्यश्री केंगे
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

कडधान्याची भेळ

साहित्य - मूठभर मूग, मटकी, चवळी, हरभरे, मसूर भिजवून मोड आणावेत,  ओले खोबरे पाव वाटी, कोथिंबीर धुऊन बारीक चिरलेली, टोमॅटो-कांदा , घट्ट दही अर्धी वाटी, तिखट, मीठ

कृती - मोड आलेली धान्ये कुकर मध्ये वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्यात तिखट मीठ मिसळून वर टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चवीसाठी साखर घालून दही घालून खायला द्या. ही भेळ विटामिन ई आणि प्रथिनयुक्त आहे.

मोड आलेल्या कडधान्ये-धान्याची कडबोळी

साहित्य - पाव वाटी सर्व प्रकारची कडधान्ये, सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, उडीददाळ इ. तळणीसाठी तेल, चवीनुसार तिखट मीठ, मूठभर धुवून वाळवून भाजलेले तीळ, एक चमचा हळद.

कृती - प्रथमच सर्व धान्ये-कडधान्ये भिजवून मोड आणा नंतर ती सर्व थोडीशी वाळवून भाजा. नंतर त्याचे मिक्सरमध्ये पीठ करून त्यामध्ये तिखट, तीळ, मीठ, हळद, घालून एक चमचा तेल टाकून कोमट पाण्यात भिजवा. पीठ मळून घेऊन कडबोळी करून तळावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF