उपवासाचे पदार्थ मुख्यपान

चटपटीत बटाटे

साहित्य - एक किलो बटाटे (कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत), एक ते दीड कप साधारणं आंबट दही, अर्धा कप भाजलेले तीळ, एक टीस्पून तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती - भाजलेले तीळ आणि मिरच्यांचं वाटण करून घ्यावं. या वाटणात दही घालावं. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवावं. मध्यम आचेवर एक नॉन-स्टिक पॅन मध्ये अर्धा चमचा तेल घालाव. त्यात हे वाटण घालावं. थोडावेळ परतल्यावर त्यात मीठ घालावं. आता त्यात बटाटे घालावेत. बटाट्यांना वाटण नीट लागेपर्यंत परतावं. पाणी निघून जाईपर्यंत परतावं.

रत्याळाची पोळी

साहित्य - रताळी, कणीक, गुळ वेलदोडे, थोडे मीठ, दोन - तीन चमचे तेल, तांदळाची पिठी.

कृती - रताळी शिजवून, सोलून वाटून घ्यावी. एक वाटी रत्याळाचा गोळा घेतल्यास एक वाटी गुळ घ्यावा. दोन्ही एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. चवीला वेलदोड्यांची पूड घालावी. एक वाटी कणीक घेऊन सैलसर भिजवून घ्यावी. कणकेचा छोटा उंडा घेऊन, लाटून, वाटीचा आकार करुन रताळ्याचे सारण त्यात भरावे व पोळी लाटावी.गरम असतांनाच साजूक तूप लावून ठेवावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF