पक्वान्ने मुख्यपान

काजूचे मोदक


साहित्य - अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे, १० काजूचे बारीक केलेले तुकडे, २ वाटी कणिक दुधात भिजवुन, १/२ वाटी पीठी साखर, २ वेलचीची पूड, १/२ वाटी तूप 

कृती  - ओले खोबरे, काजूचे तुकडे, पीठी साखर, वेलची पूड एकत्र करुन सारण तयार करुन घ्या. भिजवलेल्या कणकेचे २१ छोटे गोळे करुन घ्या. एक गोळा घेऊन त्याची लाटी लाटा. साखर, खोबरे, विलायची, काजू तुकडे मिसळून तयार केलेले सारण भरा. मोदकाचा आकार देऊन तूपात मंद आचेवर तळा. रंग बदला की काढून घ्या. हे मोदक २-३ दिवस चांगले राहतात.

कणकेचे मोदक

साहित्य - एक नारळाचा किस, एक वाटी गुळ, एक चमचा खसखस भाजलेली ,एक चमचा वेलदोडा पावडर, एक चमचा तेल, चिमुटभर मीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप, काजूचे तुकडे.

कृती - नारळाचा चव ,गूळ एकत्र शिजवून घ्यावा. वेलदोडा पावडर व भाजलेली खसखस टाका. यात दोन मोठे चमचे साजूक तूप टाका. काजू बदाम टाका. कणकेत मीठ, तेल, टाकून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात लावून पातळ पु-या लाटून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या. चाळणी किंवा मोदकपात्रात मोदक वाफून घ्या. 

काही घरांमधून विसर्जनाच्यावेळी हे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात .

उपवासाचे(व-याच्या तांदळाचे)मोदक

साहित्य - २ फुलपात्रे व-याच्या तांदुळाचे पीठ, २ वाट्या साखर , १ मोठा नारळ , ७-८ वेलदोडे , २५ ग्रॅम बेदाणा , २ टेबलस्पून तूप , १ केळे (वाटल्यास).

कृती - नेहमीप्रमाणे नारळ व साखर ह्यांचे सारण तयार करावे. त्यात वेलदोड्याची पूड व बेदाणा घालावा. केळे बारीक चिरून आयत्या वेळी घालावे (हवे असल्यास). व-याचे तांदूळ घरी दळावे व चाळणीने पीठ चाळून घ्यावे. २ फुलपात्रे पाणी गॅसवर ठेवून, पाण्यातच मीठ व तूप घालावे. पाण्याला उकळी आली, की त्यात व-याचे पीठ वैरावे व उलथण्याच्या टोकाने ढवळावे. झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. नंतर खाली उतरवून, २ मिनिटांनी उकड चांगली माळून, नेहमीप्रमाणे अगर साचा वापरुन मोदक करावेत. हे मोदक उपवासाला सुद्धा चालतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF