शितपेये मुख्यपान

तात्पुरते कोकम सरबतसाहित्य - ताजी कोकमफळे, चवीनुसार मीठ, साखर, जिरेपूड.

कृती - कोकमे स्वच्छ धुवून फोडावीत व आतला गर काढून पाण्यात टाकावा. गर चांगला कुस्करून घ्यावा, नंतर त्यात चवीनुसार साखर, मीठ व जिरेपूड घालावी. साखर विरघळली की पाणी गाळून घ्यावे नंतर त्यात बर्फ घालून सरबत पिण्यास द्यावे.

 

कोकमाचे टिकाऊ सरबतसाहित्य -१ किलो कोकम, चविनुसार मीठ, दोन फुलपात्री भरून साखर.

कृती - कोकमाची वरची साले बारीक चिरून घ्यावीत. त्यात साखर व मीठ घालून ठेवावे. या मिश्रणाला १-२ दिवसात खूप रस सुटेल, तो गाळून घ्यावा. गाळलेला रस बरणीमध्ये भरून ठेवावा. सरबत प्यायला देताना ग्लासभर थंड पाण्यात ४-५ चमचे गाळलेला कोकमाचा रस घालून, थोडेसे मीठ घालून ढवळून व बर्फ घालून सरबत द्यावे.

 

थंडाईसाहित्य - १०० ग्रॅम खसखस, २०० ग्रॅम बदाम, १ चमचा बडीशेप, २ चहाचे चमचे सुंटपूड, १ चहाचा चमचा मिरपूड, २५० ग्रॅम साखर, १ लिटर दूध. १ लिटर थंड पाणी, वेलचीपूड, १०० ग्रॅम संकलेल्या गुलाबपाकळया.

कृती - बदाम, बडीशेप, खसखस, मिरपूड, गुलाबपाकळया, सुंठ, साखर व वेलचीपूड हे सर्व जिन्नस पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत. हे मिश्रण बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. थंडाई करतेवेळी दूध व पाणी समप्रमाणात घेऊन त्यात साखर विरघळून घ्यावी. चार-पाच चमचे थंडाई घालून सारखे करून पिण्यास द्यावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF