भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

कोथिंबीरीचे वडे

साहित्य - २ जुड्या कोथिंबीर,७-८ हिरव्या मिरच्या,५-६ लसूण पाकळ्या,१ इंच आले बारीक वाटून,१ वाटीभर डाळीचे पीठ,2 टेबलस्पून बारीक रवा,मीठ,१ चिमूट खायचा सोडा,तळण्यासाठी तेल

कृती - कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपडयावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळावेत. चटणी सोबत वाढावेत.

डाळीचे वडे

साहित्य - १ वाटी चणा डाळ, १ वाटी मुगाची डाळ,१ वाटी उडदाची डाळ,अर्धी वाटी तुरीची डाळ, अधी वाटी मसुराची डाळ , आल्याचा तुकडा,७-८ हिरव्या मिरच्या,१ वाटी ओल्या खोब-याचा किस,१ वाटी चिरलेली कोथिंबीर,१ चमचा जिरे,२ चमचे मीठ, अर्धा चमचा गरम मसाला , तळण्यासाठी तेल

कृती - सर्व डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. चार तासांनंतर डाळी वाटून घ्याव्यात . वाटलेल्या डाळीत आले-मिरची-जिरे वाटण, खोबरे, कोथिंबीर, मीठ व मसाला घालावा. जास्त तिखट हवे असल्यास थोडे लाल तिखट घालावे. चमचाभर तेल घालून मिश्रण कालवावे. त्याचे छोटे गोल किंवा चपटे वडे करून तळावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF