मधल्या वेळचे पदार्थ मुख्यपान

मसूरडाळ खिचडी

साहित्य - १ वाटी तांदूळ,अर्धी वाटी मसूरडाळ, अर्धी वाटी गाजराचे तुकडे,अर्धी वाटी कोबी ४-५ छोटे कांदे, १ टोमॅटो, अर्धा चमचा जिरे, १ हिरवी मिरची, हळद , मीठ , बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे तूप व ओले खोबरे

कृती - डाळ व तांदूळ वेगवेगळे धुवून ठेवावेत. पातेल्यात तुपावर जिरे व मिरची फोडणीस टाकून त्यावर भाज्या, मीठ, हळद, टोमॅटो घालून ३-४ मिनिटे परतावे. त्यात डाळ घालून ५ वाट्या गरम पाणी घालावे. उकळी आली की तांदूळ घालावे दहा मिनिटांनंतर आंच कमी करावी व झाकण ठेवावे. मंद आचेवर खिचडी शिजू द्यावी. पाच मिनिटांनंतर कडेने चमचाभर साजूक तूप सोडावे. वाढताना कोथिंबीर व खोबरे घालावे. पापड, लोणचे, दही व ताक याबरोबर ही खिचडी खावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF