पोळी-भाकरी मुख्यपान

फुलके


साहित्य - १ वाटी कणीक, २ चमचे मोहन, मीठ

कृती - मीठ व तेल घालून कणीक भिजवावी. ती फार सैल किंवा फार घटृट नको, नंतर ती थोडी मुरू द्यावी. नंतर बेताचा पीठाचा गोळा घेऊन पातळ पोळी लाटावी. या पोळीची घडी घालू नये. नंतर ही फुलका पोळी तव्यावर टाकावी व लगेचच उलटवावी. उलटल्यानंतर जास्त वेळ तव्यावर राहू द्यावी. खालच्या बाजूने लाल डाग पडेपर्यंत भाजल्यावर निखार्‍यावर किंवा गॅसवर शेकावी. शेकतांना फुलक्याची कच्ची बाजू निखार्‍यावर येईल असा फुलका टाकावा. नंतर फुलक्याला तूप लावून ठेवावे.

गाकर


साहित्य - २ वाटया जाडसर कणीक, २ टेबलस्पून तेलाचे मोहन, मीठ, १ चमचा साखर, अर्धा चमचा सुंठपूड

कृती - सर्व एकत्र करून पीठ भिजवावे. मोठया पुरीएवढे लाटावे व तव्यावर शेकावे. नंतर फुलक्याप्रमाणे विस्तवावर शेकावे. चहाबरोबर नाश्त्याला उपयोगी पडतात.

रोटली


साहित्य - कणीक, तेल, मीठ, साय, दूध

कृती - कणकेत तेलाचे मोहन व मीठ घालून एकत्र करावे. त्यात अर्धा वाटी साय घालावी. नंतर थोडे दूध व थोडे पाणी घालून पीठ भिजवावे, नंतर ह्या पीठाच्या लहान आकाराच्या पोळया कराव्या. तव्यावर दोन्हीकडून शेकून घ्याव्या. नंतर कडेने तूप सोडावे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF