पोळी-भाकरी मुख्यपान

रत्याळाची पोळी

साहित्य - रताळी, कणीक, गुळ वेलदोडे,थोडे मीठ, दोन - तीन चमचे तेल, तांदळाची पिठी.

कृती - रताळी शिजवून, सोलून वाटून घ्यावी. एक वाटी रत्याळाचा गोळा घेतल्यास एक वाटी गुळ घ्यावा. दोन्ही एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे. चवीला वेलदोड्यांची पूड घालावी. एक वाटी कणीक घेऊन सैलसर भिजवून घ्यावी. कणकेचा छोटा उंडा घेऊन, लाटून, वाटीचा आकार करुन रताळ्याचे सारण त्यात भरावे व पोळी लाटावी.गरम असतांनाच साजूक तूप लावून ठेवावी.

ज्वारीचे धपाटी

साहित्य - ३ वाट्या ज्वारी पीठ, १ वाटी कांदा किसून, १ चमचे लसूण, १ चमचे दाणेकूट व तीळकूट, १/२ वाटी कोथिंबीर, तिखट, मीठ, तेल

कृती - सुरणाची कोवळी पानं मधला दांडा वगळून बारीक चिरावीत .कढाईत फोडणीमध्ये सुक्या मिरच्यांचे दोन-तीन तुकडे तळून त्यावर भिजवलेली चणा डाळ टाकून परतावी. थोडी मऊ झाल्यावर सुरणाचा पाला टाकावा. पाला परतून त्यावर आमसुलाचं पाणी घालावं. मीठ, तिखट, गुळ घालून भाजी मंद आचेवर शिजू दयावी. शेंगदाण्याचा कूट, खोबरं घालून खायला द्यावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF