उपवासाचे पदार्थ मुख्यपान

रताळयाचे गोड काप


साहित्य - अर्धा किलो रताळी, १ वाटी साखर, १ वाटी ओला नारळ, ५-६ वेलदोडे, तूप.

कृती - रताळयाची साले काढून विळीवर त्याचे गोल काप करावेत व स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात २ टेबलस्पून डालडा घालून त्यात धुतलेल्या फोडी घालाव्यात. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. झाकणीवर थोडेसे पाणी घालावे. म्हणजे फोडी मऊसर, छान शिजतात, नंतर रताळी शिजल्यावर त्यात नारळ, साखर व वेलची पूड घालावी. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. हे रताळयाचे काप लहान-मोठया सर्वांना फार आवडतात.

रताळयाची फराळी खांडवी


साहित्य - रताळयाचे पीठ २ किलो, आलं, मिरची, कोथिंबीर, मीठ तसेच १०० मि.ली ताक.

कृती - प्रथम रताळयाच्या पीठात ताक टाकून मिक्स करावे. आले, मिरची, कोथिंबीर नीट चिरून ठेवावी. तूपात जिरे मीठ, हळद, टाकून फोडणी द्यावी. त्यात आले, मिरची, कोथिंबीर इ. टाकून नीट हलवावे. त्यात रताळयाचे पीठ व ताकाचे मिश्रण टाकून मंद विस्तवावर थोडेसे शिजवावे. घट्ट झाल्यावर ताटलीत पसरवावे.

दाण्याची आमटी


साहित्य - १ वाटी दाण्याचे कूट, ३-४ हिरव्या मिरच्या, २-३ आमसुले, मीठ, गूळ, २ लवंगा, १ दालचीनीचा तुकडा.

कृती - दाण्याचे कूट थोडे पाणी घालून, पाटयावर वाटून घ्यावे. मिरच्या, लवंगा, दालचिनी हेही वाटावे. नंतर त्यात आणखी पाणी घालून मिश्रण सारखे करावे. मीठ, आमसुले व गूळ घालावा. नंतर आमटी उकळण्यास ठेवावी. पळीत तूप घालून जिर्‍याची फोडणी करावी व ती आमटीत घालावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF