कच्च्या केळयांची भाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य : भाजीची ३ कच्ची केळी, ३-४ हिरव्या मिरच्या, १ नारळ, ५-६ छोटे कांदे, १/२ चमचा जिरे, २ कडीलिंबाचे डहाळे, १ डाव तेल, चवीनुसार मीठ

कृती : केळाची साले काढून प्रत्येक केळाचे १६ तुकडे करावेत व ते थोडया ताकात घालून स्वच्छ धुवावेत. मिरच्या वाटून घ्याव्यात. नंतर थोडी हळद व वाटलेली मिरची केळांना चोळून ठेवावी. थोडया पाण्यात मीठ घालून, त्यात केळांच्या फोडी टाकून मंदाग्नीवर त्या शिजवून घ्याव्यात. सर्व पाणी आटून केळाच्या फोडी कोरडया कराव्यात. १/२ नारळ व जिरे बारीक वाटून केळांवर घालावे. सतत हलवत रहावे. नंतर खाली उतरून ठेवावे. दुसर्‍या पातेल्यात तेल,हळद,मोहरी घालून फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगावर आला, की त्यात खोबरे खवून घालावे व जरा परतावे. त्यात शिजलेली केळी टाकून पुन्हा जरा परतावे व उतरवावे. आता ही भाजी तयार झाली.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF