शाही तांबडा भोपळा

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य - लाल भोपळा, चिंच, मीठ, मेथी दाणे, खसखस, खोबर्‍याचा किस, हळद, तिखट, पिस्ता, गूळ

कृती - लाल भोपळयाच्या सालीसकट मोठया फोडी कराव्यात. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी व मेथी दाणे टाकावे. नंतर खसखस व खोबर्‍याचा कीस टाकून परतून घेणे व त्यानंतर भोपळयाच्या फोडी टाकाव्या. चिंचेचा लहान तुकडा, तिखट, मीठ घालून पाणी न घालता भाजी मंदाग्नीवर शिजू द्यावी. शिजल्यावर थोडा गूळ घालून परतून घ्यावी. नंतर चिरलेली कोथिंबीर व पिस्ता घालून सजवावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF