अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

शितपेये

 


 

भारत देश हा उष्ण कटिबंधातला देश असल्यामुळे वर्षभर हवा गरमच असते. थंड प्रदेशापेक्षा उष्ण देशातील लोकांना शरीराला पेयांची गरज जास्त असते. त्यामुळे पाणी पिणे हा भारतीय जेवणाचा एक अविभाज्य भाग असतो. मार्च महिना सुरू झाला की उन्हाळा चांगलाच जाणवू लागतो. हा उन्हाळा वाढत जाऊन अगदी असह्य होतो. त्यावेळी सर्वप्रथम आठवण होते ती गारेगार सरबतांचीच. उसाचा रस, लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे, कोकमचे सरबत अशी पेये साखरेची गोडी व पाण्याचा गारवा यामुळे थकलेल्या शरीराला उल्हासित करतात. ‍निसर्गाने मुक्तहस्ते दिलेल्या तजेलदार, रसरशीत फळांपासून चांगल्या चवीची सरबते बनविता येतात. आजकालच्या नाना रंगाच्या व चवीच्या कृत्रिम सरबतांच्या जमान्यात ही नैसर्गिक सरबते कधीही उत्तम. त्यासाठी येथे दिल्या आहेत त काही सरबतांच्या कृती.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF