तुम्हाला माहिती आहे का? मुख्यपान

बर्फाचा गोळा (सफर अंतराळाची)

बालमित्रानो, सूर्यमालेतील बरेच ग्रह तुम्हाला ठाऊक असतील. प्लुटोचे नाव तुम्ही एेंकले असेलच, हा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह आहे. त्याच्यावर भयानक थंडी आहे. त्यावरील तपमान वजा २९० सेल्सियस एवढे कमी आहे. म्हणून त्याला गोठलेल्या वायूंचा स्नोबॉल (बर्फाचा गोळा) असे म्हणतात. आपल्याकडे त्याला 'कुबेर' म्हणतात. सूर्याभोवती पृथ्वीपेक्षा चाळीसपट अधिक अंतरावरून तो लंबवर्तुळाकार फेरी मारतो. तब्बल २४८.७५ वर्षे त्याला ही प्रदक्षिणा घालण्यास वेळ लागतो. या प्रदक्षिणा काळात सूर्यापासून त्याचे सर्वात जवळचे अंतर ४५० कोटी किलोमीटर व सर्वात लाबंचे अंतर ७५० कोटी किलोमीटर असते. तर स्वत:भोवती फेरी मारण्यास ६ दिवस ९ तास लागतात.

या ग्रहाचा शोध प्रो. पेरसिव्हल यांनी मोठया चिकाटीने व जिद्दीने लावला. नेपच्यूनच्या पलीकडे एक ग्रह असावा या कल्पनेने त्यांनी अचूक गणित मांडून अमक्या ठिकाणी तो दिसेल असे सांगून लिहून ठेवले होते. पण प्रत्यक्षात तो पाहण्याआधी त्यांचे निधन झाले. मग जवळ जवळ १४ वर्षानी त्यांच्या शिष्याने क्लाईड टॉमबाघ याने १९३० साली ग्रह शोधून काढला. अर्थात बापल्या गुरूंच्या गणिताप्रमाणे. आता हे लक्षपूर्वक गंमतीचे वाचा... प्लुटो हा जरी शेवटचा ग्रह असला तरी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतांना त्याचा भ्रमण कक्षेचा काही भाग नेपच्यूनच्या भ्रमणकक्षेच्या आत येतो. म्हणजेच तेवढया काळापुरता नेपच्यून हा शेवटचा ग्रह ठरला जातो. हा कालावधी १९७९ ते १९९९ पर्यत होता. मग त्यानंतर पुन्हा प्लुटो हा सर्वात शेवटचा ग्रह बनला. काही शास्त्रज्ञांच्या मते (उपग्रह) असावा. परंतू १९७८ साली खुद्द प्लुटोलाच एक चंद्र असल्याचा शोध लागला. जेम्स ख्रिस्ती याने शक्तिशाली दुर्बिणीच्या साहय्याने त्याचा शोध लावला. त्याचा आकार प्लुटोच्या निम्म्याने आहे. म्हणजे हा प्लुटोचा जुना भाऊ असावा का? आणि मग आपल्या कुडंलीत ज्योतिष शास्त्रातही नवग्रहाऐवजी दशग्रहांचा उल्लेख होऊ लागेल... (?) आहे की नाही गंमत...असे हे शोध -शोधक-ग्रह आणि उपग्रह... .

- शारदा बेलगांवकर

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा