छोट्यांच्या पाककृती मुख्यपान
व्हेजिटेबल सँडविच

साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे ३ चमचे भरून, मोठा टोमॅटो, १ तासलेली काकडी, १ उकडून सोललेला बटाटा, थोडेसे मीठ, अर्धा चमचा मिरपूङ

कृती : सुरी वापरता येत असेल तर टोमॅटो, काकडी, बटाटा यांचे पातळ पातळ तुकडे करा. ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असेल तर अमूल बटर एका वाटीत घालून ती वाटी गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते पातळ होऊन सर्व ब्रेडला नीट लावता येते. आता त्यावर काकडीचे तुकडे ठेवा व अगदी थोडे मीठ वरून घाला. नंतर टोमॅटोचे तुकडे ठेवा व त्यावर बटाटयाच्या चकत्या ठेवा पुन्हा अगदी थोडे मीठ वरून टाका आणि मिरपूडही टाका, त्यावर दूसरा ब्रेडच्या स्लाइस घालून दोन्ही हातात मिळून ते जरा दाबा. सुरीने सॅडविचचे एकसारखे दोन किंवा दोन त्रिकोण होतील अशारितीने तुकडे करा. याच पध्दतीने चारी सॅडविच तयार करा. खायला घेताना बरोबर टोमॅटो साँस घ्या.

गोड सँडविच

साहित्य : ब्रेडचे ८ स्लाइस, अमूल बटर चहाचे तीन चमचे भरून, ४ चमचे मध

कृती : ब्रेडच्या स्लाइसला एका बाजूने अमूल बटर लावून नीट पसरवून घ्या. थंडीचे दिवस असेल तर अमूल बटर एका वाटीत घालून ती वाटी गरम पाण्यात ठेवा म्हणजे ते पातळ होऊन सर्व ब्रेडला नीट लावता येते. ब्रेडचा दुसरा स्लाइस घेऊन त्याला एक चमचा मध सगळीकडे एकसारखा पसरून नीट लावा. आता अमूल लावलेल्या स्लाइसवर मध लावलेला स्लाइसच्या कोरडया बाजू बाहेर येतील. सुरीने सॅडविचचे एकसारखे दोन किंवा दोन त्रिकोण होतील अशारितीने तुकडे करा.

मसाला पापड

साहित्य : २ मोठे राजस्थानी उडीद पापड, १ बारीक चिरलेला कांदा, २ बारीक कापलेले लाल भडक टोमॅटो, दोन चमचे भरून धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, लहान अर्धा चमचा लाल तिखट, थोडेसे अमूल बटर.

कृती : यात पापड भाजून घेण्यासाठी तुम्हाला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. थोडया गरम पाण्यात अमूल बटर घातलेली वाटी ठेवा म्हणजे ते विरघळेल व पातळ होईल. आता थोडे बटर घेऊन पापडाच्या एका बाजूला हाताने नीट पसरवून लावा. पापड एका प्लेटमध्ये ठेवा व बटर लावलेली बाजू वरच्या बाजूला येईल असे पहा. पापडावर थोडा कांदा, टोमॅटो व कोथिंबीर सगळीकडे पसरून घाला. सर्वात शेवटी वरून लाल तिखट व मीठ टाका, झाला मसाला पापड खायला तयार.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा