ऍंन्डीपॅन्डी
आज जो तुम्ही ऍंन्डीपॅन्डीचा कार्टून शो बघता तो किती जुना आहे माहितीये का ? चक्क पन्नास वर्ष जुना.
११ जुलै १९५० साली प्रथम बीबीसीवर दाखवला गेला. ऍंन्डी हे पात्र पिकनीक बास्केट मध्ये राहणारं. त्याचे आणखीन दोन मित्र आहेत पॅन्डीटेडी आणि लूबीलू. हे तिघेही जण पिकनीक बास्केट मध्येच राहतात. ऍंन्डीपॅन्डी जेव्हा आसपास नसतात तेव्हा लूबीलू प्रेक्षकांशी मस्ती करायला येतो. ह्या कार्टूनची लेखिका ब्रिटनची आहे, तिचे नाव आहे मारिया बर्ड, पपेट बनवणारे आहेत ऑड्री आणि मॉली गिबसन. १९७० साला पर्यंत २६ भाग वरचेवर दाखवले जायचे. पण २००२ मध्ये ऍंन्डीपॅन्डी नव्या वेशात, नव्या ढंगात आणि नव्या गोष्टी घेऊन बालगोपालांना हसवायला आले. त्या तिघांबरोबर कुत्रा, साप आणि पिवळा बॉलही राहायला आले. आता ऍंन्डीपॅन्डी बास्केट मध्ये राहत नसून एका छानश्या गावात राहतात. बागेत धमाल करत खूप गाणी म्हणतात. त्यांच्या काही वेबसाईटसही जरुर बघा -
http://www.screenonline.org.uk/tv/id/443679/index.html
http://www.bbc.co.uk/cbeebies/grownups/about_cbeebies/shows/andypandy.shtml
ऐंजलिना बॅलरिना
आपल्याला मिकी माऊस हे उंदराचे कार्टून माहितीच आहे तसेच ऐंजलिना बॅलरिना ही कार्टून उंदरीही अत्यंत लोकप्रिय आहे. ऐंजलिना बॅलरिना ही अत्यंत सुदंर, छान छान कपडे घालणारी उंदरी २००२ साली लंडनच्या टि.व्ही वर पहिल्यांदा दाखवली गेली. ऐंजलिना बॅलरिना हे पात्र तयार केले आहे हेलेन क्रेग ह्यांनी तर ऐंजलिनाच्या गोष्टी लिहील्या आहेत कॅथरीन होलाबर्डने. कॅथरीने लिहीलेली ऐंजलिनाची एकूण वीस पुस्तके प्रथम प्रकाशित झाली.
विलीयम, ऐलिस, सॅली, प्रिसीलिया, हेंरी, आजी-आजोबा हे सारी पात्र आपल्या सर्वांना भेटणारी. ऐंजलिना एके दिवशी खूप मोठी बॅले डान्सर होण्याचे स्वप्न पाहात असते त्यामुळे ती सतत नाच करतांना आपल्याला दिसते. ऐलिस ऐंजलिनाची खास मैत्रिण असते.त्या दोघींना एकमेकींचे प्रत्येक गुपित ठाऊक असते. ऐंजलिनाची स्वतंत्र वेबसाईट नाही आहे तिच्या विषयीची माहिती तुम्ही http://www.nickjr.com/ वर वाचू शकता आणि हो टिव्हीवर निकज्यूनिअर चॅनलला भेट द्यायला विसरु नका.
|
|

|
|
|