MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > कार्टून

माय बार्बी
बार्बी बाहूली आपल्याकडे असावी असं अगदी तीन वर्षा पासून ते तेरा वर्षाच्या मुलीपर्यंत सर्वांना वाटतं. खरोखरच वेगवेगळ्या वेशात आणि माय बार्बीकपडयात असणारी बार्बी सर्व देशांत लोकप्रिय आहे. बार्बी १९५९ साली, मॅटेल ह्या कंपनीने अमेरिकेत प्रथम आणली. बार्बीचे जनक आहेत अमेरिकन उद्योगपती रुथ हॅन्डलर. असे म्हणतात बार्बीचे डिझाईन बिल्ड लिली ह्या जर्मन बाहूली वरुन घेण्यात आले आहे. बार्बीची कहाणी मोठी रंजक आहे. रुथ हॅन्डलरची मुलगी बार्बरा बाहुल्यांशी खेळतांना कायम मोठयांचे कपडे त्यांना घालायची. तिच्या आईने ही गोष्ट रुथच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतर जर्मनीला गेले असतांना ह्या कुटूंबाला अशीच छोटयांची 'मोठी' बाहूली लिली दिसली. ह्या बाहूली वरुन रुथ हॅन्डलर ह्यांनी स्वतःच्या मॅटेल ह्या कंपनीत अशीच बाहूली बार्बी नावाने आणली. आज पन्नास वर्षांनंतरही बार्बीची लोकप्रियता कायम आहे.
आतातर कार्टून नेटवर्कवर बार्बीचे कार्टून आणि सिनेमेही लागातात. बार्बीच्या ह्या वेगवेगळ्या गोष्टी लहान मुलांना खूपच आवडतात. खरे वाटणारे डोळे, केस आणि आर्कषक कपडे हे बार्बीचे वैशिष्टय आहे.बार्बीच्या साईट्स ही खूप आहेत. त्यावर वेगवेगळे खेळ खेळता येतात. जरुर पहा -
http://barbie.everythinggirl.com/, http://uk.barbie.com/, www.barbiecollector.com/ , www.barbiegirls.com

बॅट फिंक
निक चॅनलवरचे बॅट फिंक कधी तयार केले गेले माहिती आहे का ? दोस्तांनो चक्क १९६७ साली. न्यूयॉर्क मधल्या हाल सीगर कंपनीने बॅट फिंकप्रसिध्द बॅटमॅनच्या सिनेमा वरुन बॅट फिंकची निर्मिती केली. बॅट फिंकचे जवळजवळ शंभर भाग आहेत. बॅट फिंक हा बॅट म्हणजेच वटवाघूळ आहे. पण हा काही साधा बॅट नव्हे त्याच्याकडे सुपर सॉनिक सोनार रडारच्या सुपर पॉवर्स आहेत आणि त्याचे पंखही स्टीलचे आहेत. बॅट फिंकचा साथीदार कराटे हा हुशार नाही पण शक्तीमान जरुर आहे. चिफ हा बॅट फिंकचा सल्लागार आहे जो शहरात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती बॅट फिंकला देत असतो. हुगो मात्र ह्या सिरीयल मधला व्हीलन आहे जो नेहमी वाईट कृत्य करत असतो आणि बॅट फिंकला हरवायचा प्रयत्न करत असतो. बॅट फिंकचे हे कारनामे नेटवर बघण्यासाठी ह्या साईटस जरुर बघा - www.batfinkuk.com, www.toontracker.com/batfink/batfink.htm