बॉब द बिल्डर हा भाई हा ....
बॉब द बिल्डर हे कार्टून प्रथम युनायटेड किंगडम मध्ये दाखवले गेले. बॉब हा छोटया शहरातला बिल्डर आहे. पिवळी बिल्डरची टोपी, अनेक हत्यारे, आजूबाजूचे मित्र आणि त्याची ऑफिस सहकारी वेंडी अशी प्रत्येक भागात भेटणारी सारी मंडळी आपल्या सर्वांना खूप आवडतात. बॉबची सारी हत्यारे क्लेची बनवलेली आहेत तसेच ती चक्क बोलतात सुध्दा ! बॉब द बिल्डर ह्या पात्राचे निर्माते आहेत केथ चॅमपेन. बॉबचे 'शो' आधी लंडन आणि मग अमेरिकेत दाखवले गेले. बॉबच्या प्रत्येक भागात बॉब आणि त्याचे साथीदार बांधकाम, दुरुस्ती
काम, नूतनीकरणाचे काम करुन प्रत्येकाला मद्त करत असतात. हयासाठी बॉब आणि त्याचे साथीदार सतत बाहेर असतात तर वेंडी ऑफिस संभाळते. बॉब द बिल्डरची साईट सुध्दा अप्रतिम आहे जरुर बघा - http://www.bobthebuilder.com/ ह्या साईट्चे वैशिष्टय काय माहितीये ? ही साईट फ्रांस, जपान, ऑस्ट्रिया, कॅनडा, इटली इत्यादी देशातल्या भाषांमध्येही बघता येते.तर मग इंग्लिश सोडून बाकीच्या भाषेतही साईट्स वाचायचा प्रयत्न तर करुन बघा.
बू sss
कार्टून नेटवर्कवर भेटणारा बू हा खरोखरच अजब प्राणी आहे. रुढ अर्थाने तो जंगलातल्या कुठल्याच प्राण्या सारखा तर मुळीच दिसत नाही.
बू हा एकमेव असाच आहे. त्याच्या बरोबर आहे त्याचे तीन खास मित्र - झोपाळू अस्वल, नाचणारे बदक आणि कुरकुरया वाघ. ही सगळी दोस्त मंडळी कधी बागेत, किल्ल्यावर, जंगलात... अश्या वेगवेगळ्या ठिकाणी साहस करायला जात असते. तेथे त्यांना आणखीन वेगवेगळे मित्र भेटतात. बू हे पात्र प्रसिध्द बीबीसी कंपनीने निर्माण केलेले आहे. बू चे शो थोडयाचवेळा करता असतात. पण खूप धमाल करतात. तुम्हीही जरुर बघा. आणि हो, बीबीसीच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरु नका कारण तेथे तुम्हाला बू बरोबर खेळता येईल, चित्र रंगवता येईल आणि कोलाज सुध्दा करता येईल.
|
|

|
|
|