चाचा चौधरी
अटटल चोर, पाकिटमार आणि गुन्हेगारांनो चाचा चौधरी पासून सावधान ! लाल फेटा आणि हातात छडी घेऊन फिरणारे चाचा चौधरी १९७१ पासून भारतीय मुलांचे हिरो आहेत. व्यंगचित्रकार प्राण चाचा चौधरीचे निर्माते आहेत. त्यांनी 'लोटपोट' ह्या प्रसिध्द हिंदी पाक्षिकाकरिता हे पात्र उभे केले होते. चाचा चौधरी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त एकूण दहा भारतिय भाषांमध्ये वाचले जाते. ह्या 'कॉमिकच्या' दहा लाखापेक्षाही अधिक प्रति खपतात.
चाचा चौधरीचे साथीदार आहेत त्यांचा कुत्रा रॉकेट, राक्षस साबू आणि त्यांची पत्नी बिनी. त्यांच्या पुढील काही गोष्टींमध्ये बिल्लू आणि पिंकी सुध्दा आहेत. साबू जरी राक्षस असला तरी संकटात सापडलेल्या चाचा चौधरींना तो कायम मदत करत असतो. चाचा चौधरींची बुध्दी संगणकापेक्षाही जास्त वेगाने चालते. चाचा चौधरींचे शत्रू आहेत राका, गोबर सिंग, धमाका सिंग. चाचा चौधरींना ताकदीची गरज पडल्यास साबू तातडीने मदत पाठवतो. चाचा चौधरींकडे 'गांधी पध्दतीचे' घडयाळ आहे. त्यांना कलिंगड खायलाही खूप आवडते. चाचा चौधरींवर टेलिव्हिजन सिरियलही तयार केली गेली होती. सध्या ती सिरियल चालू नसली तरी तुम्ही चाचा चौधरीची कॉमिक्स हॅरी पॉटरच्या जमान्यातही वाचू शकता. जरुर वाचा. चाचा चौधरीच्या साईट आहेत - http://www.diamondcomic.com/subpage/chacha.html, http://en.wikipedia.org/wiki/Chacha_Chaudhary
डोनाल्ड डक
मिकी माऊसच्या जोडीने असणारा डोनाल्ड डक हा वॉल्ट डिस्ने कार्टून मध्ये अंकल डोनाल्ड म्हणून ओळखला जातो.
डोनाल्डचे संपूर्ण नाव डोनाल्ड फॉन्टलरॉय डक. मोठी पिवळी चोच, फताडे पाय आणि थोडा घोगरा आवाज असणारा डोनाल्ड डक कायम ’सेलर’ शर्ट, टोपी आणि पॅंट न घालता असतो. इतर वेळेला खूश असणारा डोनाल्ड डक मिकी आणि त्याच्या भाच्यांवर कायम वैतागलेला असतो. ऍनिमेटर डिक लूंडीने ९ जून १९३४ रोजी डोनाल्ड डकला निर्माण केले. दुसरया महायुध्दाच्या काळात युरोप मध्ये डोनाल्ड डकला बंदी केली होती. पण डोनाल्ड डकची लोकप्रियता प्रत्येक पीढीत वाढतच गेली. डोनाल्ड डकवर सिरीयल्स, सिनेमा, व्हिडीओ गेम्स, कॉमिक्स, पुस्तके अश्या अनेक गोष्टी निघाल्या आहेत. काळानुसार आता साईट्स पण उपलब्ध आहेत. तुम्हीही डोनाल्ड डक अंकल बरोबर कार्टून नेटवर्कवर जरुर एंजॉय करा.
|
|

|
|
|