गो डिगो गो
गो डिगो गो हा डोराचा चुलत भाऊ. तिच्या सारखाच मस्ती करणारा आणि साहसी. गो डिगो गो आहे आठ वर्षांचाच पण तो कायम जंगलातल्या प्राण्यांना वाचवत असतो. जंगलातल्या प्रण्यांवर त्याचे प्रचंड प्रेम असते. त्यांना वाचवण्यासाठी तो अगदी जीवावर उदार व्हायलाही तयार असतो. त्याच्या साथीला क्लिक नावाचा कॅमेरा असतो जो गो डिगो गो ला संकटात सापडलेल्या प्राण्यांना सापडायला मदत करतो. गो डिगो गो ची मोठी बहिण ऍलिशीया अकरा वर्षांची असते. ऍलिशीयाला संगणक खूप आवडत असतो. तिने असा प्रोग्रॅम तयार केला असतो की संगणकाद्वारे तिला प्राण्यांचे आवाज, अडचणी समजून घेता येतात. त्यामुळे गो डिगो गो ला तिची खूपच मदत होते. तुम्ही गो डिगो गोला निक ज्यूनियरवर भेटायला विसरु नका कारण गो डिगो गो आणि ऍलिशीया एक प्रकारे पर्यावरणाचा समतोल राखायला मदत करतात. गो डिगो गोची वेबसाईही धमाल आहे - http://www.nickjr.com/shows/diego/index.jhtml
क्यूटी डॉग किपर
निकज्युनिअरवरचा बालवाडीच्या मुलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे ' किपर '. किपर हा कुत्रा असून त्याचा मित्र आहे टायगर, स्कॉटी कुत्रा, पिग एक डुक्कर, आणि पिगचा भाचा अरनॉल्ड. किपरचे आवडते खेळणे आहे झेबरा. किपरच्या पुस्तकांत आणि टिव्ही मालिकांत रोज घडणारे छोटे छोटे प्रसंग चित्रित केले आहेत. किपरचे जनक आहेत माईक इंकपेन. त्यांनी २००५ साली किपरच्या ३४ गोष्टी लिहील्या. अल्पावधीतच पुस्तकांच्या ८ कोटी प्रती विकल्या गेल्या. पुस्तकावर आधारीत मालिकेला सुध्दा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. मालिकेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यात ' बाफटा ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कारही समाविष्ट आहे. किपरचे थीम सॉंग आहे ' किपर नामका डॉग, डॉगी जो पहेने स्लिपर, प्यारा डॉग, क्यूटी डॉग ' किपर बरोबर धमाल करायची असल्यास http://www.hitentertainment.com/kipper/ वेबसाईटला जरुर भेट द्या.
|
|

|
|
|