MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > कार्टून

मेडेलाइन

सध्या कार्टून नेटवर्कवर आपल्याला भेटणारी 'मेडेलाइन' ही आठ वर्षांची आपली मैत्रिण खरं खूप मोठी आहे बरं का ! किती माहितीये ? मेडेलाइनची पुस्तक ऑस्ट्रियन लेखक लुडवीग बेमेलमॅननी १९३९ साली पहिल्यांदा लिहिली. पुस्तक खूपच लोकप्रिय झाल्यामुळे बेमेलमॅननी १९४०-५० साली सुध्दा लिहीली आणि आतापर्यंत त्यांचा नातू जॉन बेमेलमॅन लिहीत होता. ह्या वरुन मेडेलाइनची मुलांशी जमलेली गट्टी तुमच्या लक्षात येईल.
मेडेलाइन मेडेलाइन ही तिच्या इतर ११ मैत्रिणीं आणि बाईंसोबत पॅरिस मध्ये राहणारी छोटी मुलगी आहे. ह्या बाराजणी कायम सहाच्या रांगेत चालणारया आहेत. मेडेलाइन ही त्यांच्यात सर्वात लहान तरी सर्वात बहादर ! मेडेलाइनकडे आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याची कला आहे. कधी चोरांना पकडणारी, कुत्र्याला वाचवणारी, मैत्रिणींना मदत करणारी, निसर्गात रमणारी मेडेलाइन सर्वांना खुपच आवडणारी आहे. पुस्तकांनंतर मेडेलाइनची टिव्हीवर तर आलीच पण तिच्या फ्रेंच चित्रपटही निघाले आहेत. मेडेलाइनची वेबसाइट आहे
http://www.madeline.com/ मेडेलाइनचे थीम सॉंग आहे -
In an old house in Paris that was covered with vines,
lived twelve little girls in two straight lines
They left the house, at half past nine ...
The smallest one was Madeline.



मिर्मो

कार्टूननेटवर्कवर दिसणारा मिर्मो हे खरे जॅपनीज कार्टून आहे. मिर्मो कार्यक्रमाची मुख्य नायिका आहे केटी. एके दिवशी केटीला जादुचा कप सापडतो. कपात चॉकलेट दुध ओतल्यावर, प्रेमाची परी ( पण मुलगा ) प्रगट होतो त्याचे नाव मिर्मो. केटीला तिचा मित्र डायलन युकी खुप मिर्मोआवडत असतो आणि मिर्मोनी त्यांना दोघांना भेटवण्यात मदत करावी असे मिर्मोला वाटत असते. पण होते भलतेच मिर्मोला केटीला मद्त करण्यापेक्षा चॉकलेट खाण्यात आणि मिर्मोला चिडवण्यात जास्त रस असतो. मिर्मोला डायलन कडे असणारी परी रिरुमू खूप आवडत असते. ह्या सगळ्यांमध्ये घडणारया गमतीजमती म्हणजेच मिर्मोचा प्रत्येक एपिसोड.
मिर्मोला प्रथम २००१ साली जपानच्या 'शोगाकुकान' मासिकात कॉमिक मालिकेत सादर केले गेले. अल्पावधीत लोकप्रिय झाल्यामुळे २००२ साली जपान टिव्हीवर सादर करण्यात आले.
मिर्मोला त्यावेळचा ' चिल्ड्रन ग्रुपचा पुरस्कारही मिळाला होता. तेव्हापासून मिर्मो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
मिर्मोच्या जपानी भाषेत असलेल्या वेबसाईट बघायला विसरु नका -
http://www.konami.jp/gs/game/mirumo/
http://www.vap.co.jp/mirumo/
http://po1.oninet.ne.jp/bonami/milmo/index.html

 





 

 






























   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.