आगया नॉडी....
लाल पिवळ्या गाडीत बसून, निळया टोपीला घुंगरू लावून टॉयलँड मध्ये रहाणारा नॉडी तुमचा अगदी लाडका आहे. नॉडीचा जन्म लंडन मध्ये झाला. नॉडी हे पात्र एनिद ब्ल्याटन ह्या लेखिकेचे आहे. एनिद ब्ल्याटन ह्या मुलांच्या ब्रिटीश लेखिका होत्या. ब्ल्याटनची इतर गाजलेली पुस्तके म्हणजे ' फेमस फाईव्ह' आणि ' सेव्हन सिक्रेट्स'. नॉडीच्या गोष्टी प्रथम दिग्दर्शक कोरियन ह्यांनी लंडनच्या टिव्हीवर सादर केल्या. अल्पावधितच नॉडी लोकप्रिय झाला. नॉडीची गोष्टीची पुस्तकेही पंचवीसपेशा जास्त आहेत. एकटया फ़्रान्स मध्ये नॉडीच्या पुस्तकांचा खप सहा कोटींच्यावर होता. भारतातही नॉडीची लोकप्रियता अफाट आहे. आपल्या इथे नॉडी कार्टून नेटवर्क, डिस्ने चॅनलवर दाखवले जातात. टॉयलॉडमधले नॉडीचे सोबती आहेत बंपी कुत्रा, मि. प्लॉड, गोबलिन चोर, दिना डॉल, मार्था मंकी. नॉडीच्या ह्या दोस्तांबरोबर धमाल करायची असेल तर जरुर पहा नॉडीची वेबसाईट www.noddy.com
ओसवाल्ड ऑकटोपस
ओसवाल्ड हा निळ्या रंगाचा ऑकटोपस. तुम्ही त्याला निकजुनिअर चॅनलवर पाहिले असेल. ओसवाल्डचा निर्माता आहे डॉन याकारिनो. डॉन याकारिनो हे मुलांचे लेखक असून त्यांचे लेखन अतिशय साधे आणि सोपे आहे. त्यांच्या पात्रांचे रंगही उजळ आणि आल्हादायक असतात. ओसवाल्ड आपल्या मित्रांसोबत जसे की हेनरी पेंग्विन, विनी कुत्रा, डेझी सनफ्लॉवर बरोबर मोठया अपार्टमेंट मध्ये राहात असतो. ओसवाल्ड छान पियानो वाजवतो आणि छान गाणीही म्हणतो. मनाने अतिशय चांगला आणि दुसरयांना मदत करणारा ओसवाल्ड पाण्याजवळ असला की मात्र ' लाईफ जॅकेट ' घालतो. ओसवाल्डला कॅथरिनाच्या 'डायनर' हॉटेलात जाऊन ' स्विझलबेरी ' आईसक्रिम खायला खुप आवडते. ओसवाल्ड ऑकटोपसची वेबसाईट आहे - http://www.hitentertainment.com/oswald/uk/intro.htm
|
|

|
|
|