MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > कार्टून

पेपा पिग

पेपा पिग आणि तिचा भाऊ जॉर्ज ह्या दोघांना तुम्ही पोगो आणि निक ज्युनिअर चॅनलवर पाहात असाल. पेपा पिग आणि तिचे कुटूंबिय हे पेपा पिगआहेत डुक्कर पण माणसांसारखे वागतात, कपडे घालतात, कार चालवतात आणि आपल्या सारख्या घरात राहातात. हां, आता नाही म्हणायला कधी कधी चिखलात लोळतात आणि आवाज पण डुक्करांसारखाच काढतात. पेपाच्या कुटूंबात तिचे आई-बाबा, भाऊ जॉर्ज, आजी-आजोबा आहेत. पेपाच आवडत खेळणं आहे तिचा टेडी आणि जॉर्जचा आहे डायनॉसॉर. पण जॉर्ज बहुतेक वेळा त्याला डायनेसॉर म्हणतो. पेपा प्रथम सादर केले लंडनच्या ऍशले बेकर डेविस याने. प्रथम अमेरिकेत दाखवला गेलेला हा कार्यक्रम नंतर सारया जगभरात दाखवला गेला. आतातर तो आपल्या इथे सुध्दा दिसतो. दहाव्या ब्रिटीश ऍकेडेमी चिल्ड्रन फिल्स मध्ये पेपा पिगला उत्क्रुष्ट बालगट ऍनिमेशन फिल्मचे पारितोषिक मिळाले. पेपा पिग हे फक्त लहानांचेच नाही तर तुमच्या बरोबर मोठ्यांनाही बघायला सांगा. आणि हो, पेपा बरोबर धमालकरायची असेल तर www.peppapig.com ला जरुर भेट द्या.



पिंगू पेंग्विन

पिंगू ही स्विस ऍनिमेटेड फिल्म असून दशिण ध्रुवावर राहाणारया पेंग्विन्सची आहे. हा मुख्यता कौटुंबिक कार्यक्रम असून पिंगू आणि पिंगू पेंग्विनत्याचा मित्र रॉबी सिल विषयी आहे. पिंगूच्या कुटूंबात आईवडिल आणि त्याची नुकतीच जन्मलेली बहीण पिंगा आहे. पिंगू 'इग्लूत' राहातो. त्याचे मुख्य खेळ हे बर्फावरचे असून रॉबी सोबत तो अधिक रमतो. पिंगूच्या गोष्टी डॅनी गिल्बर्ट ह्यांनी लिहील्या असून ऑटमर गुटमन ह्यांनी 'क्लेमेशन' प्ध्द्तीने सादर केल्या आहेत. पिंगूच्या कार्यक्रमाची वेळ फक्त पाच मिनिटे असूनही हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. पिंगूचे सर्वात मोठे यश म्हणजे पिंगू आणि इतर पात्रांच्या तोंडी कोणतीही विशिष्ट भाषा नाही. त्यांची ही खास 'पिंग्विश' भाषा संहिते शिवाय प्रथम कार्लो बोनोमी ह्यांनी सादर केली आहे.पिंगू बरोबर धमाल करायची असल्यास www.pingu.net ला जरुर भेट द्या.




 

 






























   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.