MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > कार्टून

पोकेमान

तुमच्या सगळ्यांचा आवडता पोकेमान ह्या वर्षी ११ वर्षांचा झाला आहे. पोकेमान हा खरं तर ' निंटेंडो' नावाच्या कंपनीचा व्हिडीओ गेम पोकेमानआहे. परंतु अल्पकाळात लोकप्रिय झाल्यामुळे पोकेमानची टिव्ही सिरियल, पुस्तके, खेळणी, कपडे सर्वत्र पोकेमानचेच 'ब्रॅंडींग' झाले. पोकेमानचे निर्माते आहेत जपानचे कार्टूनिस्ट सातोशी ताजिरी. पोकेमानची कार्ड मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. पिकाचूच्या मदतीने शत्रूंचा संहार करणारा पोकेमानचे अनुकरण समस्त बच्चे कंपनी करत असते. पोकेमानची वेबसाईट www.pokeman.com अप्रतिम डिसाईन केली आहे. साईटवर अनेक गेम्स आणि व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. तुमच्या संगणकावर चिकटवण्यासाठी 'वॉलपेपरसही ' आहेत. तर मग टिव्हीच्या बरोबरीने बेवसाईट आणि पुस्तकांमध्येही पोकेमानला भेटायला विसरु नका.

 

परमॅन आ गया..

हंगामा चॅनलचे एक लोकप्रिय कार्टून म्हणजे परमॅन. मूळ जपानचे असलेले हे कार्टून तेथे 'पारमॅन' किंवा 'पा-मॅन' नावानेही ओळखळे जाते. परमॅनचे जनक आहेत ही 'फुजीको' आणि 'फुजीयो' ही कलाकार जोडी. मासिकात प्रसिध्द होणारया परमॅनच्या गोष्टी नंतर जपान टिव्हीवर १९६७ मध्ये प्रथम दाखवल्या गेल्या. तेव्हा हे कार्टून अर्थातच 'ब्लॅक ऍड व्हाइट' होते. जपान बरोबरच परमॅन अमेरिका आणि युरोप मधल्या देशात लोकप्रिय झाले.

परमॅन हा पाचजणांचा चमू आहे. त्यात दोन मुलं, एक मुलगी आणि एक माकड आहे. ह्या पाचजणांची निवड 'सुपरपरमॅनने' शहराच्या मदतीसाठी आणि रक्षणासाठी केली आहे. त्यांच्यातला लिडर आहे 'मित्सू', त्या नंतर आहे माकड ' बुबी', मित्सूची मैत्रिण 'पाको ', आणि जाडया मित्र 'पायान '. ह्या प्रत्येकाकडे स्पेशल ' परमॅन किट' असते. हे किट म्हणजे त्यात एक हेलमेट आहे ज्यामुळे त्यांना सुपरपॉवर मिळते. विशिष्ट आंगारखा घातल्या मुळे त्यांना उडता येते. त्यांच्या जवळ स्वत:चे रोबोट पण असतात ज्या द्वारे ते एकमेकांशी संपर्क ठेवून असतात.
परमॅनच लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे परमॅन कायमच रोजच्या जीवनातले अडथळे, प्रॉब्लेम्स सोडवत आले आहेत. त्याच बरोबर ह्या मालिकां मधून 'जॅपनीज लाईफस्टाइल' विषयी सुध्दा बरेच कळते.

परमॅन स्पॅनीश मध्ये 'एल होमरे पार', ब्राझीलमध्ये ' सुपर डायनॅमो', इटली मध्ये ' हीरो बॅंबिनो' नावाने तिथल्या मुलांना हसवतो आहे. त्यांचे मनोरंजन करतो आहे. म्हणूनच परमॅनच्या गाण्याही म्हटले आहे " सुपरमॅनसे 'सू' हटालो, परमॅन बन गया ". सुपरमॅन इतकाच हीरो असणारा परमॅन !

भाग्यश्री केंगे 
नाशिक



 

 









 

 






















   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.