MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > कार्टून

लिटील रेड ट्रॅक्टर

लिटील रेड ट्रॅक्टर हे ऍनिमेटेड कार्टून साधारण २-३ वर्षांच्या मुलांकरिता आहे. छोटया गोष्टी, अप्रतिम रंगसंगती आणि गोष्टींमधली साधी राहाणी मोठया मुलांनाही खिळवून ठेवते.
लिटील रेड ट्रॅक्टर कार्टून बी.बी.सीने निर्माण केले आहे. लिटील रेड ट्रॅक्टरच्या गोष्टी कोलीन रीडर आणि पिटर टाई ह्यांनी १९९० मध्ये लिहील्या. जुन्या पण व्यवस्थित काम करणारया लिटील रेड ट्रॅक्टर ह्या मुख्य पात्रा भोवती गोष्टी फिरतात. लिटील रेड ट्रॅक्टरचा मालक आणि दोस्त आहे स्टॅन. स्टॅन आहे त्या परिस्थीशी जुळवून घेणारा, दुसरयांना कायम मदत करणारा आहे. स्टॅनचा शेजारी आहे जोन्स. त्याच्या कडे असणारया मोठ्या निळ्या ट्रॅक्टरची ( बिग ब्लू ) त्याला घमेंड आहे. जोन्स अतिशय स्वार्थी आणि स्टॅनला कायम कमी लेखणारा आहे.
स्टॅनच्या शेतात आणि गावात घडणारया छोटया छोटया गोष्टी लिटील रेड ट्रॅक्टरच्या सोबतीने पाहायला मजा येते. तुम्हीही जरुर पहा आणि लिटील रेड ट्रॅक्टरच्या
http://www.bbc.co.uk/cbeebies/littleredtractor/ ह्या वेबसाईटला लॉगइन करायला विसरु नका.


शॉन द शीप

शॉन द शीप हे निक चॅनलवर असणारे कार्टून इतर कार्टून्सपेक्षा जरा हटके आहे. शॉन द शीप ही कथा आहे शॉन ह्या मेंढयाची. शॉन हा इंग्लंड मधल्या फार्म हाऊसवर राहाणारी मेंढी. शॉन त्याच्या कळपापेक्षा अत्यंत वेगळा वागत असतो. त्याच्या ह्या साहसी आणि थोडयाश्या आगाऊ स्वभावामुळे त्याचा कळप कायम अडचणीत येत असतो. ह्या कळपाला राखणदार असतो बिस्टर कुत्रा. शॉन कधी शेतातल्या कोबीचा फुटबॉल करतो तर कधी माणसाचा कोट घालून पिझ्झा आणायला जातो. ह्या सर्व प्रकारात येणारया संकटात त्याचे रक्षण करतात कळपातील इतर सदस्य आणि बिस्टर कुत्रा. शॉन हे पात्र प्रथम दिसले १९९५ सालच्या ऑस्कर पुस्कार प्राप्त फिल्म ' अ क्लोज शेव्ह ' मध्ये. त्यानंतर अडमॅन ऍनिमेशन्सनी शॉन द शीप ह्या नावाने सिरियल आणली. आतातर ती चक्क ७२ देशात दाखवली जाते. शॉन द शीपची साईट आहे - http://www.shaunthesheep.com/

भाग्यश्री केंगे 
नाशिक




 

 









 















   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.