MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

बालनगरी > कार्टून

शीनचॅन नोहारा

हंगामा चॅनलवर मस्ती करणारा शीनचॅन, त्याची सतत ओरडणारी आई, वैतागलेली टीचर आणि झोपा काढणारे बाबा... ही सारी मंडळी शीनचॅन नोहाराबच्चे कंपनीची अतिशय लाडकी आहे. शीनचॅन नोहारा हे पात्र लिहीले योशितो उसुइ ह्यांनी. शीनचॅन हा पाच वर्षांचा बालवाडीत जाणारा मुलगा. प्रथम एका जपानी मॅगझीन करता लिहिलेल्या शीनचॅनच्या गोष्टी १९९२ मध्ये टिव्हीवर दाखवल्या गेल्या. जपानच्या कुसूकाबे शहरात राहाणारा शीनचॅन त्याचे कुटूंबिय, शाळेतले मित्र, शिक्षक आणि त्याचा लाडका कुत्रा शिरो ह्यांच्या भोवती हया कथा घडतात. शीनचॅनच्या वागण्या, विनोदी बोलण्यामुळे तो लोकप्रिय आहे. परंतु कधीकधी त्याच्या आगाऊ बोलण्यामुळे आणि वयापेक्षा मोठे असल्यासारखे वागण्यामुळे तसेच मोठया स्त्रियांबरोबर त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे शीनचॅन वादाच्या भोवरया सापडला होता. तरी ह्या वर्षात शीनचॅन आपला पंधरावा वाढदिवस साजरा करत आहे. दोस्तांनो, शीनचॅन तुम्ही बघा पण त्याच्या सारखे वागायला जाऊ नका. आणि हो, शीनचॅनच्या http://www.shinchanshow.com/ ह्या वेबसाईटला भेट द्यायला विसरु नका.


टॉम ऍंन्ड जेरी

उंदीर आणि मांजराची ही ऍनिमेटेड कथा बच्चे कंपनी मध्ये भलतीच लोकप्रिय आहे. सतत त्रास देणारा उंदीर आणि कायम त्याच्या टॉम ऍंन्ड जेरीमागावर असणारी मांजर आणि ह्या दरम्यान घडणारया गमती-जमती पाहून हसून हसून पुरे वाट होते. ऍनिमेटर्स विल्लियम हन्ना आणि जोजेफ बार्बरा टॉम ऍंड जेरीचे जनक आहेत. त्यांनी एकूण एकशे चौदा भाग लिहीले आहेत. ह्या सिरीजने प्रतिष्ठेचा ऍकॅडेमी पुरस्कार प्राप्त केला आहे. १९४० ते १०५७ पर्यंत चालणारे हे लोकप्रिय कार्टून नंतर काही काळासाठी बंद पडले. वॉट डिस्ने ह्या जगप्रसिध्द कार्टून कंपनीने नंतर ते पुन्हा वितरीत केले. टॉम ऍंड जेरी वर चित्रपटही तयार केला गेला आहे. आतातर त्यांच्या DVD/VCD ही उपलब्ध आहेत. प्रत्येक वेळेला जेरी (उंदीर) शिताफतीने टॉम (मांजर)च्या तडाख्यातून हुशारीने आणि चपळाईने सुटतो. नेटवर टॉम ऍंड जेरीला भेटायचे असल्यास जरुर बघा -
http://www.cartoonnetwork.com/tv_shows/tomjerry/,
http://www.tomandjerryonline.com/

 

भाग्यश्री केंगे 
नाशिक


 

 









 


 

 














   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.