MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map


स्मार्ट किड्स


शहाणी नीतू

नीतूकडे अनेक खेळणी होती.छोटया बाहुल्या,बार्बी डॉल्स,भातुकली,गाडया आणि मोठी लाल रंगाची कार ज्यात बसून नीतूला छानपैकी फिरता यायचे.नीतूच्या मैत्रिणींनाही तिचीही गाडी खूप आवडायची.गाडीत बसण्यासाठी अनेकदा भांडणेही व्हायची.काही दिवसांनी नीतूची मैत्रिण शामलीने लाल रंगाची नवीन स्कूटर आणली.एक पाय स्कूटरवर आणि एक जमिनीवर ठेऊन ही स्कूटर चालवली की काय वेगाने चालायची.सगळ्या मुली बघतच राहत.नीतूला ह्या स्कूटर समोर आपली कार अगदी साधी वाटत होती.आपल्याकडेही कार ऐवजी स्कूटर असती तर बरं झाले असते असे नीतूला वाटले.घरी आल्यावरही तिच्या डोक्यात तोच विचार होता.संध्याकाळी बागेत खेळण्याऐवजी नीतू आपल्या कारजवळच विचार करत बसली.तिच्या डोक्यातून स्कूटरचे भूत काही गेले नव्हते.रात्री जेवायच्यावेळी आईने नीतूच्या आवडीचा पुलाव आणि रायते केले होते तरी तिचे जेवणात अजिबात लक्ष नव्हते."काय झाले नीतूली,तुझे जेवणात अजिबात लक्ष नाहीये?”,आईने प्रेमाने भरवत तिला विचारले."आई,आज शामलीच्या बाबांनी तिच्यासाठी मोठी लाल स्कूटर आणली.आपल्या कारपेक्षाही खूप छान.मलाही तशीच स्कूटर हवी आहे.घेऊन दे ना",नीताने हटट केला.आईने सजावले,"नीतू,अगं प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असेलच असे नाही.दुस-याकडे असलेली प्रत्येक गोष्ट आपण विकत घेऊच शकू असेही नाही."

"अगं पण मला ती स्कूटर खूपच आवडली आहे म्हणून हवी आहे",नीताने हटट केला."नीता हटट न करणा-या,व्यस्थित जेवणा-या मुलांची इच्छा सहज पूर्ण होते.तूही तशीच वागलीस तर लवकरात लवकर तुझीही इच्छा अशीच पूर्ण होईल.” आईने समजावून सांगितले.आईचे बोलणे नीतूने व्यवस्थित लक्षात ठेवले आणि त्याप्रमाणेच शहाण्या मुलीसारखी वागू लागली.

होताहोता नीतूचा सहावा वाढदिवस आला.वाढदिवसाला तिचे सगळे मित्र मंडळी,आत्या आणि काकाही आला होता.आईने तिच्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक,इडली सांबार आणि शंकरपाळे केले होते.पार्टीत खूप मजा आली.नीतूला मात्र आश्चर्य वाटले की कुणीही तिला वाढदिवसाचे गिफ्ट दिले नाही.तिने हळूच जाऊन आईला विचारले.आई गालात हसत तिला गॅलरीत घेऊन आली.तिथे मोठया रंगीत कागदात काहीतरी गुंडाळले होते."नीतू बघ,सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी काय गिफ्ट आणले आहे",आई म्हणाली.नीतूने घाईने कागद बाजूला केला तर लाल स्कूटर!अगदी तिच्या मनात होती तशीच!

नीतूने आलेल्या सगळ्या मैत्रिणींना आणि मोठयांना धन्यवाद दिले.आज नीतू खूपच आनंदात होती कारण तिच्या शहाण्यासारख्या वागण्यामुळे तिला तिच्या आवडीचे गिफ्ट मिळाले होते.

भाग्यश्री केंगे

shree@marathiworld.com




 

 


 

 

 








 

 






















 
     
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.