अंबाडीची पातळ भाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य : २ जुडया अंबाडीजी पालेभाजी, १/२ वाटी तुरीची डाळ, १/२ वाटी तांदुळाच्या कण्या, १ चहाचा चमचा तिखट, चवीनूसार मीठ, २-३ चहाचे चमचे डाळीचे पीठ, गूळ एक मोठया लिंबाएवढा, फोडणीसाठी १ डाव तेल व हळद- मोहरी प्रत्येकी एक चमचा, लसणाच्या फोडणीसाठी १ डाव गोडेतेल, २ लसणाचे गड्डे (सोललेले)

कृती : अंबाडीची भाजी निवडून धुवून बारीक चिरावी. एका पातेलीत तुरीची डाळ, तांदुळाच्या कण्या व अंबाडीची भाजी घालून, बेताचे पाणी घालून पातेली कुकरात ठेवून भाजी शिजवून घ्यावी. भजी शिजल्यावर वरचे पाणी बाजूला काढून, डावेने भाजी घोटून घ्यावी. घोटतांना त्यात थोडे डाळीचे पीठ घालावे. नंतर त्यात वरील काढलेल पाणी घालावे. आपल्याला जितकी पातळ भाजी हवी असेल, त्या मानाने पाणी घालावे. नेतर मोठया पातेल्यात मोहरी, हळद तेलाची फोडणी करावी. त्यावर ही शिजलेली भाजी घालावी. नंतर तिखट, मीठ, थोडा गूळ घालावा. पण पुष्कळांना ही भाजी आंबट आवडते. तसेच पुष्कळ जणांना या भाजीबरोबर लसणीची फोडणी खूप आवडते. त्यासाठी लहान कढईत १ डाव तेल गरम करावे, सोललेल्या लसणाला जरासे ठेचून मीठ चोळावे व लसणीच्या पाकळया गरम तेलात टाकाव्यात व मंद अग्नीवर लसणी तळू द्याव्यात. नंतर गॅस बंद करून त्यात थोडेसे लाल तिखट घालावे. या पध्दतीने केलेली लसून कुरकुरीत होते. प्रत्येकाच्या आवडीनुसार भाजीला पुन्हा वरून लसणीची फोडणी वाढावी.

टीप : अंबाडीच्या भाजीबरोबर भाकरी चांगली लागते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF