वालाची (डाळिंब्यांची) उसळ

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य - २ वाटया मोड आलेल्या सोललेल्या डाळिंब्या, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा किस, १ चमचा जिरे, ४-५, हिरव्या मिरच्या, १/२ चमचा लाल तिखट, १ मोठया लिंबाएवढा गूळ, ४ चहाचे भरून खवलेले ओले खोबरे, चवीनुसार मीठ, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी १ मोठा चमचा गोडेतेल, १/२ चहाचा चमचा प्रत्येकी मोहरी, हिंग, हळद

कृती - डाळिंबा आधणाच्या पाण्यात शिजत ठेवाव्या. त्या शिजून पार लगदा होणार नाही अशी काळजी घ्यावी. जिरे व सुके खोबरे एकत्र भाजून, कुटून घ्यावे, मिरच्या वाटून घ्यावा. डाळिंब्या शिजल्यावर त्यात जिरे, खोबरे कूट, तिखट, हळद, गूळ व चवीप्रमाणे मीठ घालावे. डाळिब्यांवर खमंग हिंग-हळदीची फोडणी द्यावी. डाळिंब्या वाढतेवेळी वरून खोबरे व कोथिंबीर घालावी.

टीप - ही उसळ शिजत असतांना त्यात थोडे दूध घातले, तर डाळिंब्या आख्या राहतात. डाळिंब्या शिजण्याआधी जर गूळ घातला तर त्या ताठरतात व चांगल्या लागत नाही.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF