शेवग्याच्या पानांची भाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य - अर्धी वाटी मुगाची डाळ, १ मोठा कांदा, कडीपत्ता, मिरजी, जिरे, हिंग, हळद, शेवग्याची कोवळी पाने, १-२ आमसुले, मीठ, फोडणीसाठी तेल

कृती - अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा तास भिजत घालावी. १ मोठा कांदा बारीक चिरून घ्यावा. तेलावर कडीपत्ता, मिरची, जिरे, हिंग, हळदीची फोडणी करून त्यावर चिरलेला कांदा परतून घ्यावा. मग मुगाची डाळ त्यावर टाकून वाफ काढून शिजवून घ्यावी. डाळ शिजवल्यानंतर त्यावर शेवग्यांची कोवळी पाने, मीठ, १-२ आमसुले टाकून भाजी वाफेवर शिजवावी. पोळी किंवा भाकरीबरोबर ती रुचकर लागते.

(शेवगा हा अतिशय उष्ण असून तो भूक वाढविण्याचं काम खूप चांगल्याप्रकारे करतो.)

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF