सेवासुविधा मुख्यपान

 

ह्या महिन्याचे राशिभविष्य

राशीभविष्य - जून २०१७

एस. जी. अकोलकर


राशीस्वामी स्वनक्षत्रातून भ्रमण करीत आहे. त्यामुळे प्रकृत्ती उत्तम राहील. फक्त त्वचाविकाराची काळजी घ्या. आपले म्हणणे आक्रमकपणे ग्राहकांच्या गळी कसे उतरवायचे हे कसब शिकून घ्याल. मार्केटिंगसाठी तर याचा उपयोग होईलच पण कार्यालयातही वरिष्ठांना तुमच्याबद्दल आत्मविश्वास वाढेल. वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग आहेत. महिलांना माहेरच्यांकडून काही लाभ होतील. तरूण, मनमिळाऊ स्वभावाचा जोडीदार शोधतील. जोडीदाराशी संवाद साधणे थोडे जड जाईल.

अनुकूल - २, ९, १७, २६ प्रतिकूल - १९, २८


मंगळ धनस्थानातून भ्रमण करीत आहे. आपली आर्थिक प्राप्ती वाढवता येईल. ग्राहकांचे मन जिंकून घेण्यासाठी लागणारे वाक्चातुर्य व थोडी आक्रमकता याचा उपयोग करून मार्केटिंगमध्ये मोठी झेप घेता येणे शक्य आहे. ऊर्जा, इंधने, मोबाईल्स, पोलिस यंत्रणा या क्षेत्रातील व्यक्तींची प्राप्ती लक्षणीयरित्या वाढेल. महिला नातेवाईकांना भक्कम मदत करू शकतील. तरूणांना निसर्गरम्य ठिकाणी आपले प्रेम व्यक्त करता येईल.

अनुकूल - ५, ११, २३, २६ प्रतिकूल - १३, २१


राशीवरील मंगळ उत्साह प्रदान करणारा आहे त्या उत्साहामुळे आकर्षित होऊन अनेक नव्या व्यक्ती संपर्कात येतील. कार्यालयीन कामासाठी किंवा इतर शाखातील माणसांना प्रशिक्षण देण्यासाठी बाहेरगावचे दौरे चालूच राहणार आहेत. काम आणि मौज यांचा कुटुंबासमवेत आनंद घेऊ शकाल. भावडांचे प्रश्न सोडवण्यात महिलांचा वेळ जाईल. तरूणांचा वेळ संदेशांच्या देवाण-घेवाणीत व भेटीत व्यतीत होईल.

अनुकूल - २, ८, १३, २२ प्रतिकूल - ४, २४


व्ययातला मंगळ - मनस्थिती बिघडवील. भावनंच्या भरात कुठलेही काम हाती घेऊ नका मागून पश्चाताप करण्याची पाळी येईल. कार्यालयात फाजील आत्मविश्वासाने नवे आव्हान स्वीकारु नका. तापटपणावर नियंत्रण न ठेवल्यास कामातही चुका होतील. खर्चाला अनेक तोंड फुटणार आहेत म्हणून महिलांनी महागडी खरेदी टाळावी. मुलांचे शैक्षणिक प्रश्व व तरुणांचे विवाह लांबणीवर पडतील.

अनुकूल - ५, १०, १९, २५ प्रतिकूल - ३, २२


चतुर्थेश मंगळही स्वनक्षत्रात आहे. त्यामुळे जमीन, जागा किंवा फ्लॅट खरेदीचा योग निश्चित येऊ शकतो अशी जागा जर एखाद्या व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी वापरली तर फारच उत्तम. कार्यालयात हिशोबाची प्रकरणे योग्य प्रकारे हाताळल्याबद्दल गौरव होइल. मुलांना शिक्षणासाठी कदाचित दूर जावे लागेल. तरूणांच्या विवाहात शिक्षण महत्वाचा मुद्दा ठरेल.

अनुकूल - प्रतिकूल -


मंगळाचे दशमातून भ्रमण व्यवसायास पोषक आहे. कार्यालयात नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुमच्या टीमचे नेतृत्व तुम्ही कसे पार पाडता यावर वरिष्ठांची नजर राहील. तुम्ही ही जबाबदारी समर्थपणे पेलाल. प्रवासाला चालना मिळेल. बाहेरगावी केलेले दौरे फलप्रद ठरतील. महिलांनी खरेदी केलेल्या वस्तूंची बिले जपून ठेवावीत. कारण गुणवत्तेत फसवणूक संभवते. तरूणांना जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.

अनुकूल - ५, ९, १९, २४ प्रतिकूल - २, १३


स्वनक्षत्रातील धनेश मंगळ आणि भग्यस्थ शनी आर्थिक प्राप्ती वाढवण्यास अनुकूल आहेत. मात्र त्यासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे गावोगावी फिरावे लागेल. शासकीय अधिकार्‍यांच्या भेटी घ्याव्या लागतील. तंत्रज्ञांना आपले म्हणणे पटवून द्यावे लागेल. कार्यालयात नेतृत्वगुण दाखवण्यास वाव मिळेल. मुलांना नेत्रदीपक यश मिळाल्याने महिलांना समाधान वाटेल. तरूणांना कार्यक्रमात एखादी आकर्षक व प्रगल्भ व्यक्ती भेटेल.

अनुकूल - ३, १२, १८, २७ प्रतिकूल - ६, १४


द्वितीयातला शनि आणि अष्टमातला मंगळ स्वनक्षत्रात आहे. त्यामुळे वारसाहक्काने जी काही स्थावर - जंगम मालमत्ता मिळाली असेल त्यामधून भरघोस उत्पन्नाचा ओघ सुरू होईल. यासंबंधीची काही प्रकरणे कोर्टात गेली असल्यास निकाल तुमच्याच बाजूने लागेल. कार्यालयात कनिष्ठ सहकारी मार्गदर्शन घेण्यासाठी तुमचीच निवड करतील. स्त्रीयांनी ब्यूटिक, फॅशन इ. चे क्लासेस काढावेत. तरूणांना तापट जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल.

अनुकूल - ६, ९, २०, २४ प्रतिकूल - ७, १८


शुक्राचे पंचमातले भ्रमण म्हणजे मौज-मजा-मस्ती, बराचसा वेळ मित्र-मैत्रिणींच्या सहवासात घालवण्या इतपत निवांतपणा नक्की मिळू शकेल. जवळपासच्या सहली, सफरी, अभयारण्यात भटकंती यात मुलांना सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न राहील. सुट्टीमध्ये मुलांनी कुठल्यातरी कलेतले सुरूवातीचे धडे घ्यावेत असा महिलांचा आग्रह राहील. कार्यालयीन कामासाठी दौर्‍यावर मात्र जावे लागेल. तरूणांनी थिएटरमध्ये किंवा नाट्यगृहात झालेल्या ओळखींचा लाभ यावा.

अनुकूल - ५, १०, १९, २५ प्रतिकूल - ३, २२


कार्यालयातले तणावाचे निर्माण झालेले वातावरण हळूहळू निवळू लागेल. तुमचे आसन अस्थिर करण्यासाठी किंवा तुमची दुसर्‍या खात्यात वा बाहेरगावी बदली घडवून आणण्याचे विरोधकांचे प्रयत्न थंडावतील. आता एकच काळजी घ्या की या ताणामुळे आलेल्या तापटपणावर नियंत्रण मिळवा. उगाच चिडचीड करू नका. महिलांना माहेरच्या माणसांचे वेध लागतील. तरूणांना भावना फुलवणारा साथीदार मिळेल.

अनुकूल - ५, १०, १९, २५ प्रतिकूल - ३, २२


गुरूचे भ्रमण आता प्रतिकूल स्थानातून होणार आहे. म्हणून लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही. राशीस्वामी शनि पूर्णत: अनुकूल असल्याने तुमची सर्व स्वप्ने धीम्या गतीने का होईना पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतील. वैवाहिक जीवनात मात्र अधिक काळजी घ्या. घायकुतेपणाने नव्हे तर समजुतीचे धोरण स्वीकारल्याने बरेच प्रश्न सुटतील. तरूणांनी जोडीदाराची प्रकृती सांभाळावी.

अनुकूल - ७, १२, २१, २६ प्रतिकूल - १४, २४


मंगळाचे भ्रमण प्रतिकूल आहे. आपल्या तापटपणावर नियंत्रणे ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर आपल्याच हट्टापायी स्वत:च्याच अडचणी उभ्या कराल. योग्य निर्णय घेता यावा म्हणून मनाचे संतुलन राखणे जरूरीचे आहे. सुदैवाने महिलांनी मित्र - मैत्रिणी पारखून घ्यावेत. तरूणांना प्रशिक्षणाच्या संधी येतील.

अनुकूल - ३, ७, २३, २७ प्रतिकूल - ७, १८

 

व्यक्तिगत सल्ल्यासाठी संपर्काचा नवीन पत्ता -

श्री. एस जी अकोलकर
बिल्डिंग नं. ७ - अ फ्लॅट नं. ४९९ (२रा मजला),
जुनी एमएचबी कॉलनी,
एल.टी. रोड समोर
बोरिवली पश्चिम,
मुंबई-४०००९१

संपर्क - ९८६९२२९८४४

ई-मेल - हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

डॊन वास्को- सिग्नल नंतर होटेल विविध पाशी उजव्या हाताला वळा. सरळ पुढे या. उजव्या बाजूला - (सलोनी ब्यूटी पार्लर तळमजला)

 

उत्तर प्रदेशाचे राज्यपाल मा.राम नाईक यांचे हस्ते Marathiworld.com चे ज्योतिषी एस.जी.अकोलकर यांचा सत्कार शिवजयंतीस करण्यात आला. त्यांच्या ३५ वर्षाच्या ज्योतिषसेवेचे महत्त्व जाणून  मुंबईतील जोगेश्वरी युवा प्रतिष्ठानने त्यात पुढाकार घेतला. श्री अकोलकर याचे योगदान असे :
 
मराठी  चित्रपट :
१) कलावंत विकणे आहे 
२) आपली माणसे 
३) श्रद्धा
 
टी.व्ही. मालिका :
१) बंदिनी(अधिकारी ब्रदर्स)
२) हाथकडी (मुंबई दूरदर्शन)
 
नाटक : 
१) चालविशी हाती 
२) तीन लाखावी गोष्ट (नाट्यसपंदा)
३) धुके न्हाऊन गेले  (महाराष्ट्र शासन पुरस्कार)
 
पटकथा : कुटुंब नियोजन (राष्ट्रीय पुरस्कार.)
टेलिफिल्म : तीस लाखांची गोष्ट. (E TV.)
YouTube : धन धना धन (पूर्ण नाटक)
 
दैनिक व मासिक : 
१) मुंबई सकाळ. (१२ वर्षे)
२) महाराष्ट्र टाईम्स
३) कृषीवल (कोकण)
४) बहुश्रुत
 
वार्षिक : 
१) महाराष्ट्र टाईम्स
२) गांवकरी ( नासिक)
३) रसरंग
 
इंटरनेट : www.marathiworld.com
 

 

श्री. एस. जी. अकोलकर, प्रसिध्द ज्योतिषी व चित्रपट कथा लेखक. हे ह्या क्षेत्रातील जवळपास ३० वर्षांहून अधिक अनुभवी आहेत. १२ वर्षे ते मुंबई सकाळ ह्या महाराष्ट्रातील अग्रमानांकित वृत्तपत्रात स्तंभलेखन करीत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख इ. च्या बाबतीत त्यांनी वर्तवलेली अनेक राजकीय भाकिते यशस्वी झाली आहेत. श्री. अकोलकर यांचा कृष्णमूर्ती पध्दतीचा (नक्षत्रांच्या गणितीवरून मांडलेले आडाखे/सिध्दांत) गाढा अभ्यास आहे.

 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF