MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map

राशिभविष्य - फेब्रुवारी २०१२

एस. जी. अकोलकर

वरिष्ठांकडून कौतुक
राशीस्वामी वक्री झाला असल्याने काही निर्णय लांबणीवर टाकण्याची प्रवृत्ती वाढेल, किंवा निर्णय घेण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास कमी पडेल. कार्यालयात कार्यक्षमता उच्च प्रकारची राहिल्याने वरिष्ठांकडून कौतुक होईल. महत्वाच्या पदासाठी तुमची शिफारस होऊ शकेल. फर्निचर खरेदी, घरगुती उपकरणे (वॉशिंग मशिन, किंवा फिल्टर) यांच्या खरेदीत महिलांचा कल होईल. नातेवाईकांनाही आर्थिक मदत करावी लागेल. तरूणांना प्रिय व्यक्तींपासून दूर रहावे लागेल.
अनुकूल ९,१४,२२,२७
प्रतिकूल १६,२४

कलाक्षेत्रात सन्मान
सप्तमेश मंगळ कमी झाल्याने पतिराजांना पत्नीची व पत्नीला पतीची बर्‍याच वेळा मनधरणी करावी लागेल. तरी त्यांचा रुसवा कायमच राहील. कार्यालयात पूर्ण अधिकार मिळाले नाहीत तरी दुसर्‍या पंधरवडयात महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. स्वतंत्र धंद्यातील उत्पन्नात वाढ होईल. महिलांना कलाक्षेत्रात प्राविण्याबद्दल सन्मान वा पारितोषिक मिळण्याचे योग आहेत. तरूणांनी कार्यक्षेत्रात दाखवलेल्या कर्तबगारीमुळे एखादी व्यक्ती जास्त 'जवळ' येईल.
अनुकूल ८,११,२०,२४
प्रतिकूल १७,२७
मुलाखतींची आमंत्रणे
महिन्याचा दुसरा पंधरवडा जास्त अनुकूल आहे. तोपर्यंत सरकारी कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. काही नवे उपक्रम लांबणीवर पडतील. प्रवासाचे दौरेही रद्द करावे लागतील. १५ तारखेनंतर मात्र तरूणांना प्रशिक्षणाच्या वाटा खुल्या होतील किंवा परदेशी कंपन्यात मुलाखतींची आमंत्रणे येतील. महिलांची मैत्रिणींशी उगीचच भांडणे होतील. त्या आपल्या वाटेत अडचणी आणताहेत असे वाटेल. तरूणांना हॉटेलिंग, सॉफ्ट ड्रिक्स एजन्सी यात संधी मिळेल.
अनुकूल ६,१३,२८,२७
प्रतिकूल ३,२०

'सूचक' ओ
धनस्थानातील वक्री मंगळामुळे पैशाच्या देव-घेवीचे व्यवहार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवू नका. रोख रक्कम इसारा म्हणून घ्या. शासकीय कामे पहिल्या पंधरवडयात आटपा. कारखानदारांनी यंत्रदुरूस्तीकडे जास्त लक्ष द्यावे. तरूणांना जलपर्यटन, पंचतारांकित हॉटेल्स, ऑटोमोबाईल क्षेत्रात जास्त संधी येतील. राजकीय वक्तव्ये गाजतील. तरूणांना महाविद्यालयीन जगतात 'सूचक' ओळखी होतील.
अनुकूल ८,११,१९,२४
प्रतिकूल ४,२२

जोडीदाराचा सल्ला घ्या
परिस्थिती खूपच अनुकूल आहे. त्यामुळे एखाद दुसरी प्रतिकूल घटना घडली तरी त्रागा करण्याचे कारण नाही. नोकरीत स्थैर्य किंवा खास अधिकार मिळण्यास थोडा वेळ जावा लागेल. नव्या योजना आखतांना आपल्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. त्यांच्या दृरदृष्टीचा खूपच उपयोग होईल. तरूणांना शिकत असतानाच खूपच उपयोग होईल. तरूणांना शिकत असतानाच कंपन्यांकडून आमंत्रणे येतील. मंगलकार्याच्या हालचालीत मित्रांचा मोठा सहभाग राहील.
अनुकूल ५,९,२३,२८
प्रतिकूल ६,२५

नांदा सौख्यभरे
वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगू शकाल. पतिपत्नींना एकमेकांवरील प्रेमाची साक्ष पटेल. बरेचसे निर्णय एकमतानेच होतील. उत्पन्नाचा ओघ कायम राहील तरी वाढत्या खर्चाने अंदाजपत्रकात बरेच फेरफार करावे लागतील. भावडांकडूनही थोडीफार मदतीची अपेक्षा राहील. कार्यालयात ज्येष्ठ सहकार्‍यांना दुखावू नये. स्त्री सहकार्‍यांची मोलाची मदत होईल. तरूणांच्या जीवनात रसिक व आकर्षक व्यक्तीचा प्रवेश संभवतो.
अनुकूल ८,१२,२०,२४
प्रतिकूल ९,२८

प्रतिष्ठा वाढेल
राजकीय वर्तुळात झपाटयाने घडामोडी घडू शकतील. जनसंपर्क हाताळण्याच्या तुमच्या कौशल्याने मोठी झेप घेऊ शकाल. सरकार दरबारी वजन वाढेल. कारखानदारीमध्येही प्रतिष्ठा वाढण्याजोगी कामगिरी करू शकाल. भागीदारीतील व्यवसायात पूर्वीचा अनुभव उपयोगी पडेल. वाणीवर मात्र संयम ठेवणे आवश्यक. महिलांनी कुणावरही विखारी टीका करू नये. तरूणांच्या जीवनात मित्र महत्वाचे ठरतील. समंजस साथीदार त्यांच्या ओळखीतून मिळेल.
अनुकूल १०,१३,२३,२७
प्रतिकूल ३,११

सहलीचा आनंद
राशीस्वामी दशमस्थानात वक्री असल्याने त्याचा परिणाम कार्यक्षेत्रावर होणारच. ज्या जबाबदार्‍या आपण लवकर संपवू असे वाटत होते त्या अपेक्षेपेक्षा जास्त काळ लांबतील. तंत्रज्ञानाची उणीव, यंत्रसामुग्रीची दुरूस्ती यांच्याकडे जातीने लक्ष द्यावे लागतील. काम करता करता मित्र-मैत्रिणींच्या सहवासाचा, सहलींचा आनंदही लुटू शकाल. तरूणांना कलानैपुण्यावर फिदा होणारी व्यक्ती भेटेल.

अनुकूल ७,१२,२०,२५
प्रतिकूल ४,१३

घरकूल होईल
उत्कर्षाच्या दिशेने काही महत्वपूर्ण घटना घडत असतानाच त्यांना मध्येच खीळ बसल्यासारखे वाटेल. फाजील आत्मविश्वासाच्या आहारी जाऊ नका. प्रशिक्षणासाठी मोठया रक्कमेची तरतूद करावी लागेल. काही कंपन्यातील मुलाखतींच्या तारखा पुढे जातील. महिला घरसजावटीच्या योजनात दंग राहतील. जलाशयाच्या किनार्‍यावर वा आसपास छोटे घरकूल होऊ शकेल. तरूणांना हवेसे माणूस येणार्‍या पाहुण्यांमध्ये सापडेल.
अनुकूल ५,१४,१७,२८
प्रतिकूल ८,१६

देखणी ओळख
तब्येतीची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. कार्यालयातली अस्थिरता, वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक यांचा प्रत्यक्षा-प्रत्यक्ष परिणाम प्रकृतीवर होऊ शकेल. उच्च रक्तदाब, छातीत धडधड असे विकार होऊ शकतील. इस्टेटीच्याबाबतच्या वादविवादात वडीलधारी माणसेही फार काही करू शकणार नाहीत. महिलांना कलाक्षेत्रात आपली चमक दाखवण्यास संधी मिळेल तरूणांना जवळच्या प्रवासात देखणी व्यक्ती भेटेल.
अनुकूल ७,१२,२०,२५
प्रतिकूल ९,१७

छाप पाडाल
दुसरा पंधरवडा जास्त अनुकूल आहे. तोपर्यंत प्रकृतीही थोडी नरम-गरम राहील. जोडीदाराच्या हौशीसाठी खर्चही करावा लागेल. जोडीदाराच्या मन:स्थितीत अनपेक्षित चढउतार झाल्याने कसे वागावे हेच कळेनासे होईल.दूरदृष्टी वापरून आखलेल्या काही योजनांची प्रत्यक्ष फळे आता दिसू लागतील. महिलांना संगीतात प्राविण्य मिळेल. तरूणही नात्यातल्या एखाद्या माणसावर आपल्या कलानिपुणतेने छाप पाडतील.
अनुकूल ४,१०,२२,२७
प्रतिकूल ११,२०

मित्रांबरोबर मौज
राशीवरील शुक्रामुळे आकर्षणशक्ती वाढेल व मित्रमैत्रिणींचा घोळका अवतीभोवती घोटाळत राहील. करमणुकीचे कार्यक्रम, सहली, डिस्को यांचा आनंद उपभोगू शकाल. कार्यालयात महत्वाची कामगिरी पार पाडल्याने काही आर्थिक फायदा होईल. जुन्या वळणाच्या ज्येष्ठ सहकार्‍यांचा सूर मात्र वेगळाच लागेल. महिलांना नातेवाईकांकडून आदराची वागणूक मिळेल. तरूणांना नव्या उपक्रमांचे बेत लांबणीवर टाकावे लागतील.
अनुकूल ७,११,१९,२४
प्रतिकूल १३,२२



श्री. एस. जी. अकोलकर, प्रसिध्द ज्योतिषी व चित्रपट कथा लेखक. हे ह्या क्षेत्रातील जवळपास ३० वर्षांहून अधिक अनुभवी आहेत. गेली १२ वर्षे ते मुंबई सकाळ ह्या महाराष्ट्रातील अग्रमानांकित वृत्तपत्रात स्तंभलेखन करीत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख इ. च्या बाबतीत त्यांनी वर्तवलेली अनेक राजकीय भाकिते यशस्वी झाली आहेत. श्री. अकोलकर यांचा कृष्णमूर्ती पध्दतीचा (नक्षत्रांच्या गणितीवरून मांडलेले आडाखे/सिध्दांत) गाढा अभ्यास आहे.

व्यक्तिगत सल्ल्यासाठी संपर्काचा पत्ता -
श्री. एस जी अकोलकर

बिल्डिंग नंबर - २, ब्लॉक नं २८,
राजेंद्रनगर, दत्तपाडा रोड,
बोरिवली (पूर्व)
मुंबई - ४०००६६
दूरध्वनी - ९१ - २२- २८७०८६००
मोबाईल - ९८६९२२९८४४

ई-मेल - sgakolkar2001@yahoo.co.in, shashi_akolkar@rediffmail.com



 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.