नदी/तलाव मुख्यपान

प्रवरा नदी

संगम चार नद्यांचा - उदय संगमनेरचा

पुणे-नाशिक मार्गात संगमनेर छोटेसे पण ऐसिहासिक वारसा असलेले गाव. इ. स.पूर्व सुमारे २०० वर्षापूर्वी प्रवरेचा काठावर मानवी वस्ती निर्माण होउन  हळू हळू छोटेसे गाव साकारत होते. या गावाजवळ एक-दोन नाही तर चक्क चार लहान- मोठ्या नद्यांचा संगम झाला म्हणूनच या  गावाचे नामकरण 'संगमिका' झाले तेच आजचे संगमनेर होय. गावाच्या पश्चिमेला म्हाळुंगी  अणि म्हानुटी नद्यांचा संगम होतो.  म्हानुटी  आपल्या पोटात सामावून घेत  म्हाळुंगी  पुढे सरकते तोच अमृतवाहिनी पयोधरा तिची वाट पाहत असते.  म्हाळुंगी  ही मोठ्या दिमाखाने पुढे सरकत थोरल्या बहिणीने धाकटीला भेटावे  तसे पयोधरेला मिळते. संगमनेर मधील लोकांसाठी अमृतवाहिनी असणारी पायोधरा पुढे नाटकी नावाचा छोट्या नदीला आपल्यात सामावून घेत खळखळ प्रवाहात पुढचा  प्रवास करीत असते.  ही पयोधरा म्हणजेच आजची अमृतवाहिनी प्रवरा... अनंत  काळापासून  संगमनेरकरांना जीवनदाई  ठरलेली  प्रवरामाईच्या  अमृतापासून संगमनेरकर आपली तहान आणि गरजा भागवत आहेत.  अकोल्याहून येताना म्हानुटी  अलगद म्हाळुंगीच्या पोटात शिरून तिला दिलेले आलिंगन, पुढे एक  तुर्रेबाज वळण  घेत  म्हाळुंगीने आपल्यापेक्षा मोठ्या पयोधारेला ( प्रवरा) केलेली गळाभेट  त्यावेळी बारमाही  वाहणा-या नद्यांनी संगमनेरला फुलविले असे ते एकंदरीत चित्रं मनात साठविले व इतिहासात जाऊन पाहिले तर मनाला एक सुखद गारवा वाटतो. संगमनेर गावाला चोहोबाजूनी वाहणा-या नद्यांमुळे एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त झाले होते. प्रवरा, म्हाळुंगी, म्हानुटी, नाटकी, या चार नद्यांमुळे गावाभोवती एक प्रकारचा नैसर्गिक खंदकच तयार झाला होता.

पुढे हीच प्रवरामाई संगमनेर मधून वाहत जाऊन धाकटे संगमनेर, निंबाळे, वाघापूर, जोर्वे, ओझर, असा छोट्या गावातून प्रवास करीत ओझरच्या धरणात तिचे पाणी अडविले जाते. त्यानंतर प्रवरेचा पुढचा प्रवास सुरु होऊन श्रीरामपूर तालुक्याला आपले अमृततुल्य पाणी देते. अकोले तालुकातून रतनगड येथे या प्रवरेचा उगम होतो.  श्रीरामपूर मधून प्रवरा वाहत जाते पुढे नेवासा येथे त्रिवेणी संगमावर गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्याचा संगम होतो यालाच त्रिवेणी संगम असे म्हणतात.  
                                                     
शेखर पानसरे

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF