सिनेमा, नाटक परिक्षण

इतर चित्रपट करमणूक मुख्यपान

 

दोघींची यशस्विता

मामा आणि आई यांच्यामुळे मोठी बहिण शहरात येते आणि वेश्या बनते. मुलीकरवी कुटुंब चालावं ही यामागे अपेक्षा असते. रेणुका दफ्तरदार हिनं ही मोठी बहिण साकारली आहे. धाकटया बहिणीचं (सोनाली कुलकर्णी) लग्न ठरतं. तेव्हा मोठया बहिणीला बोलवायच्या आई विरुध्द असते, पण धाकटीच्या आग्रहामुळे मोठया बहिणीला बोलावलं जातं. पुढे नाटयमय प्रसंगातून आई विरघळते, मामालाही त्याच्या हातून घडलेल्या पापाची जाणीव होते आणि सुखान्त होतो. अधिक वाचा...

 

'गैर'

सगळ छान आणि सुरळीत सुरू असताना अचानक समीरच्या बाबतीत काही विचित्र घटना घडायला लागल्या. समीर श्रॉफ एकाच वेळी दोन वेगवेगळया ठिकाणी दिसला होता. जयश्रीची मैत्रिण इझारिवाला हिने समीरला ह्या शहरात त्यावेळी बघितलेलं होतं....ज्यावेळी समीर कोचिनला होता. हा इझारिवालाच्या वयाचा दोष मानून सगळयांनीच त्या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. पण जेव्हा समीर श्रॉफच्या ऑफिसमध्ये काम करणार्या मोहनलाही तसाच अनुभव आxला...तेव्हा मात्र सगळयांच्याच मनात प्रश्न उभे राहिले. जेव्हा स्वत: नेहाने हाच अनुभव घेतला ...तेव्हा ह्याच प्रश्नाचं रूपातंर रहस्यात झालं. अधिक वाचा...

 

'श्यामची आई'

१९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा 'इम्पॅक्ट' (परिणाम) मात्र आयुष्यभर राहतो......चित्रपटाने १९५३ सालचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले. राष्ट्रीय पुरस्कार १९५४ साली सुरू झाले त्यामुळे त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही 'श्यामची आई'ला मिळाला. अधिक वाचा...

 

'श्यामची आई'ला छपन्न वर्ष पूर्ण

'श्यामची आई' ह्या अजरामर चित्रकृतीला आज (शुक्रवार, ६.०३.२००९) रोजी छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये दुपारी ३ वाजता 'श्यामची आई'चा पहिला खेळ (प्रिमियर) झाला. अधिक वाचा...

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा