संस्कृती मुख्यपान

 

दागदागिने 

 

आपले सौंदर्य खुलविण्यासाठी दागदागिने घालून सजणे हे मानवजातीला फार पुरातन कालापासून ठाऊक आहे. अगदी तीन-चार हजार वर्षांपूर्वीच्या उत्खननातून सुध्दा स्त्री-पुरुषांच्या दागिन्यांचे अवशेष सापडतात. आपल्याकडे मोहेंजोदडो-हराप्पा येथील हातभर बांगडया घातलेली नर्तिकेची मूर्ती किंवा अजंठा-वेरूळ येथील शिल्पातील दागिन्यांनी नटलेल्या स्त्रिया तर सर्वज्ञात आहेतच. स्त्रियांना फुलाच्या माळा, हार, गजरे यांपासून ते सोने, चांदी, रुपे, मोती, पोवळे, हिरे आणि आता प्लॅटिनम या सर्वांपासून बनविलेले दागिने घालून मिरवायला मनापासून आवडते. भारतात प्रांताप्रांतातील आवडीनुसार वेगवेगळया जडणघडणीचे दागिने बनविले जातात. महाराष्ट्रातील स्त्रियांची नथ व पुरुषांची भिकबाळी हे अगदी वेगळे असे दागिने आहेत. याशिवाय बोरमाळ, कोल्हापुरी साज, ठुशी, तन्मणी, चपलाहार, चिंचपेटी .... यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रातील या दागदागिन्यांची अधिक माहिती या विभागात पाहू या.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF