मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला 'गैर' हा थ्रीलर सस्पेन्स चित्रपट महाराष्ट्राची चौकट ओलांडून थेट अमेरीका आणि युरोपच्या मराठी
प्रेक्षकांच्या भेटीला जात आहे. ह्या विषयी अधिक माहिती देतांना निर्माता प्रशांत घैसास आणि संतोष नवले ह्यांनी सांगितले की पुढील दोन महिन्यांसाठी 'गैर' परदेशी प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. नुकताच न्यूजर्सी येथे गैर प्रकाशित झाला आहे. ५ ते १२ मार्च ह्या कालावधीत गैरचे २२ खेळ होणार आहेत. एप्रिल आणि मेच्या दरम्यान अमेरीकेतल्या २२ शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पुढील प्रवास युरोप आणि कॅनडातही असणार आहे.
सतीश राजवाडे दिग्दर्शित ह्या चित्रपटात संदीप कुलकर्णी, अमृता खानविलकर, उदय टिकेकर, अंकुश चौधरी, इला भाटे, उदय टिकेकर, अमिता खोपकर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अधिक माहितीसाठी - www.marathiworld.com/gaiir
प्रेक्षकांच्या भेटीला जात आहे. ह्या विषयी अधिक माहिती देतांना निर्माता प्रशांत घैसास आणि संतोष नवले ह्यांनी सांगितले की पुढील दोन महिन्यांसाठी 'गैर' परदेशी प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. नुकताच न्यूजर्सी येथे गैर प्रकाशित झाला आहे. ५ ते १२ मार्च ह्या कालावधीत गैरचे २२ खेळ होणार आहेत. एप्रिल आणि मेच्या दरम्यान अमेरीकेतल्या २२ शहरांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाचा पुढील प्रवास युरोप आणि कॅनडातही असणार आहे.सतीश राजवाडे दिग्दर्शित ह्या चित्रपटात संदीप कुलकर्णी, अमृता खानविलकर, उदय टिकेकर, अंकुश चौधरी, इला भाटे, उदय टिकेकर, अमिता खोपकर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अधिक माहितीसाठी - www.marathiworld.com/gaiir

