संगीतकला मुख्यपान

 

 

 

सूरश्री केसरबाई केरकर

surashri-kesarbai-kerkarसंगीत म्हटले तर मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांत प्रामुख्याने ऐकत असतो . म्हणजेच संगीत इतरही भाषांत असते यात शंकाच नाही. काही प्रमाणात भाषेचा वापर करताना आपणास व्याकरण खूप महत्वाचे ठरते . त्यामुळे गाणे प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यास मदत होते. व्याकरणात संगीत समाविष्ट गेलं म्हणजे ते कमी दर्जाचं होतं, असं नाही. संगीतात कलाकाराची आंतरिक ऊर्जा असते.. ते यांच्याही बाबतीत कधी कधी घडायचं..

सूरश्री केसरबाई केरकर १३ जुलै १८९२ रोजी गोव्याच्या उत्तर भागातील फोंडा तालुक्यातील केरी नावाच्या लहानशा खेड्यात गोमंतक मराठा समाजात केसरबाईंचा जन्म झाला.लहानांपासूनच संगीताचे बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडून मिळत गेले . त्यामुळे लवकरच त्यांना याविषयी गोडी निर्माण झाली. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांनी आपलंस करून घेतले होते . या भारतीय संगीतशैलीतील प्रसिद्ध गायिका होत्या. भारतीय संगीतातील जयपूर घराणे शैली हि त्यांनी वापरात आणली होती. २०व्या शतकातील प्रभावी हिंदुस्तानी संगीत गायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कोल्हापुरास प्रस्थान करून उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्याकडे आठ महिने गोव्याला शिक्षण घेतले. परत आल्यावर त्यांनी प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे (वझेबुवा) यांच्याकडे आपले संगीत शिक्षण चालू ठेवल. सतत संगीताचा ध्यास उराशी बाळगून त्यांनी विविध चिजा, स्वर, रचना यांना आत्मसात केले.

वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत स्थलांतर केले. तिथे अनेक पंडितजी कडून संगीताचे धडे गिरवले.

surashri-kesarbai-kerkarसंगीताचा प्राथमिक पाय भरल्यानंतर त्यांनी १९२१ मध्ये जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्यत्व पत्करले. सुरवातीपासूनच संगीताची आवड होतीच आणि शिक्षणही भरपूर मिळाल्याने केसरबाईंच्या गायनाची कीर्ती लवकरच चहूं दिशांना पसरली. कालांतराने त्यांनी संगीत मैफिल भरविण्यास सुरवात केली . पुढे जाऊन विविध ठिकाणी संगीत मैफिल भरवून लोकांपर्यंत सुनीता पोहचवत होत्या. नंतर त्या राजे - सरदार मंडळींसाठीही नियमितपणे मैफिली करत असत. तसेच आपली गाणी लोकांना ऐकवावी तसेच ती सर्वदूर पोहचावी यासाठी त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. नोबेल पुरस्कारविजेते कवी रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते. कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने इ.स. १९४८ साली केसरबाईंना 'सूरश्री अशी पदवी बहाल केली.

surashri-kesarbai-kerkarकेसरबाईंचा गाण्याचा लहेजा पहिल्या षड्रजावरच्या ` आ ' कारातच कळायचं .ते जःपुंज षड्रज . तंबोऱ्याच्या काही क्षणांच्या गुंजनानंतर पहिला षड्रज लागला की सारी मैफिल कुठल्यातरी भावविश्वात हरवून गेल्यासारखी एकटक बघत बसायची, जणू काही हा नाद असाच कानी पडो या अनुभूतू साठी .केसरबाईंच्या जन्मगावी ज्या घरी त्यांचे बालपण गेले, तिथे आता सूरश्री केसरबाई केरकर हायस्कुलाची इमारत आहे. त्यांचा जन्म जिथे झाला, ते त्यांचे पूर्वीचे घही जवळच आहे. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जात. त्यांचा मृत्यू १६ सप्टेंबर १९७७ रोजी झाला संगीताला अशा महान गायिकांचा आजही तितकाच मोह झाल्याशिवाय राहत नाही. कारण संगीत जिवनाचा अविभाज्य घटक आहे.

 

- गोकुळ पवार

 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा