सिनेमा मुख्यपान

'श्यामची आई'ला छपन्न वर्ष पूर्ण

 

'श्यामची आई' ह्या अजरामर चित्रकृतीला आज (शुक्रवार, ६.०३.२००९) रोजी छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये दुपारी ३ वाजता 'श्यामची आई'चा पहिला खेळ (प्रिमियर) झाला. त्यावेळचे कृष्णा टॉकीज पार्शी माणसाच्या मालकीचे होते. सिनेमाचा पहिला खेळ पंचमातांच्या हस्ते झाला. ह्या पंचमाता होत्या - श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री. अश्या अनोख्या पध्तीने चित्रपटाच्या खेळाला सुरुवात झाली.

त्याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता सेनापती बापट ह्यांच्या हस्ते मुंबईच्या किस्मत चित्रपटगृहात पुन्हा उदघाटन झाले. 'श्यामची आई' हा सिनेमा दोन प्रिंटसह रिलीज झाला होता. त्याचे दिवसाला तीन खेळ होत असत. ह्या चित्रपटाची प्रथम जाहिरात नवाकाळ मध्ये २७ फेब्रुवारी १९५३ साली छापली गेली होती. जाहिरात मराठीवर्ल्डच्या वाचकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे श्री सुभाष छेडा ह्यांनी.

'श्यामची आई' | घरोघरी श्यामची आई | 'श्यामची आई'चा पहिला प्रिमियर | छायाचित्रे |

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा