मराठी रसिकांनी पाठवलेल्या ‘कविता’

आज असं का वाटतंय

आज असं का वाटतंय
तुझ्या स्वप्नात येऊन जावं
सूर ल्यालेलं ते गाणं
हळुवार गाऊन जावं
कधी कधी वाटतं
एक आनंदाश्रु बनून
हलकेच तुझ्या गालावरून
वाहवत जावं आज…
श्यामल सुंदर रातीला
तारकांच्या साथीला
वारा बनून नकळत तुझ्या
श्वासात मिसळावं आज…
पौर्णिमेच्या चांदण्यात
प्राजक्ताच्या अंगणात
फुले वेचताना तू
अलगद फुलपाखरू बनून
तुझ्या अधरांना स्पर्शावं आज…
थेंब थेंब पावसाच्या पाण्यात
वा-याच्या ओघवत्या खटयाळ गाण्यात
बनून रातराणीचा गंध
तुझ्या आसमंतात बहरावं आज…

प्रविण अंबेरकर

प्रेम

प्रेम प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असते
शुभ्र अशा दुधावर घट्ट अशी साय असते
प्रेम असतं अवीट गोडीचं कैरीच्या फोडीचं
आणि कधी ओसंडून वाहणाऱ्या पावसात
डोळयातून वाहणा-या आसवाएवढे असहाय असते
प्रेम प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असते
शुभ्र अशा दुधावर घट्ट अशी साय असते
सर्व सकारात्मक बघायला शिकवते
कधी सुखावते तर कधी
दु:ख देणारी देवाची फुकटची सोय असते
प्रेम प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असते
शुभ्र अशा दुधावर घट्ट अशी साय असते
प्रेम म्हणजे बुडत्याला आधार
तर कधी गीतेचे सार असते
अन् दोन शब्दात व्यक्त होणारे
महान काव्य असते
प्रेम प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असते
शुभ्र अशा दुधावर घट्ट अशी साय असते

प्रविण अंबेरकर

विरह

तुझे ओठ तुझं हसणं,
तुझे केस तुझं लाजणं,
यातील प्रत्येक गोष्ट मला आवडते
तू मला खुप आवडते जेंव्हा….
लाडांत लाजत मिठीत तू येते
तुझ्या कुशीत, आपल्या या छोट्याशा कुटीत
जग अगदी विसरायला होते
पण….आज…तुझ्या विरहांत….
तुझ्या आठवणींत….
यातील ओळन ओळ…..
मला अक्षरशः रडवते!!!!

कुलकर्णी दिपक एस.

तू

एक स्वप्नं मी बघावं
एक स्पप्न तुला पडावं
जे मला दिसलं
तेच तूही बघावं
हेतू फक्त एवढांच
की तू ‘हो’ म्हणावं

कसं कळेल तुला ?
कधी कळेल तुला ?
तुला कळलंय हे
कसं कळणार मला ?

कुलकर्णी दिपक एस.