मसाले भात

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य - दीड वाटी आंबेमोहोर तांदूळ, २-४ मध्यम आकाराची वांगी, पाऊण वाटी गोडेतेल, जिरे-धने मिळून २ चमचे, काळी मिरी ५-६ सुक्या लाल मिरच्या ३-४, चवीनुसार मीठ, गोड मसाला ३ चहाचे चमचे भरून, थोडासा गूळ, मूठभर काजू, कडीलिंब १ लहान डहाळी, नारळाचे ओले खरवडलेले खोबरे अर्धी वाटी, दोन मुठी धुवून चिरलेली कोथिंबीर, वरून वाढण्यासाठी साजूक तूप.

कृती - तांदूळ अर्धा तास आधी धुवून पाणी निथळून ठेवावेत. वांग्याच्या फोडी करून त्या मिठाच्या पाण्यात ठेवाव्यात. नंतर जिरे-धने, कोथिंबीर, २-४ काळे मिरे व सुक्या मिरच्या यांचे वाटण तयार करून घ्यावे. तेलाची फोडणी करून त्यात तांदूळ व वांग्याच्या फोडी परतून घ्याव्यात व नंतर त्यात गरम पाणी घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात वरचे वाटण, गोडा मसाला, काजू व चवीपुरते साखर व मीठ घालावे. वाटण फोडणीत परंतू नये म्हणजे मसालेभाताला सुंदर रेग तर येतो व चवही फार छान लागते. भात वाढताना वरून ओले खोबरे व कोथिंबीर घालावी शिवाय गरम-गरम मसाले भातावर साजूक तुपाची धार हवीच.

टीप - मसाले भात करताना त्यात तोंडली, बटाटे, कोबी, किंवा वांगी ह्यापैकी कोणत्याही भाज्या घालतात. धने, जिरे, लवंगा, दालचिनी व थोडे शहाजिरे हा मसाला कच्चा कुटून घालतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा