कथा- बबन आणि त्याचे दोस्त

लोकलमधून उतरुन मी रेल्वे ब्रिज ओलांडत होतो. कुणी तरी पाठीवर थाप मारली. चमकून मागे पाहील. बबन दवडघाव कपाळावर घाम पुसत उभा होता.
‘काय बबन, पत्ता काय तुझा? ‘ मी चौकशी केली ‘सध्या फार गडबडीत आहे’, बबन म्हणाला ‘कसल्या बुवा?’
‘काही विचारु नकोस! भारत्यातल्या आदीवासींवर एक डॉक्युमेंटरी करतोय.’
‘तुम्हा सोसीओलॉजीच्या प्राफेसरांना दूसरा सुचतय काय ? वन्य जमाती, आदिवासी – बिचारे कंदमुळ खाऊन जगतात आणि तुम्ही त्यांच्यावर जगता ! पण सिनेमाच काढलस् मध्येच’ ?
‘हा सिनेमा मी अमेरिकेत रिलीज करणार आहे. स्वत: कार्टरना बोलावणार आहे उद्धाटनासाठी!’
‘कार्टरना ?’ मी खांदे उडवले. ‘व्हाईट हाऊसच्या शेजारच्या बिऱ्हाडात राहत असल्या सारखा बोलतोय की’!
‘अरे!सुनिल माझा दोस्त ‘
‘सुनिल? हां हां. सुनिल धडफळे होय ?’
‘सुनिल धडफाळे को मारो गोली ! सुनिल दत्त्त बद्दल बोलतोय मी!.
‘त्याची तुझी कुठं ओळख?’
‘मागं एकदा ओबेरॉय शेरेटॉनमध्ये पार्टी होती. तिथ ओळख झाली. सुनिल दत्तची कार्टरशी चांगली ओळख आहे हे तुला ठाऊक असेलच.’
‘हो. ऐकलय खर.’
‘तो बिझी असला तर गोहीन आहेच’
‘गोहीन?’ मी चक्रावलो
‘गोहीन म्हणजे अमेरिकेतील भारताचे वकील !’
‘ते ठाऊक आहे रे मला, पण गोहीन आणि तू यांची एैतीहासिक भेट झाली कुठ ! ‘
‘माझी बायको वेंर्गुल्याची. गोहीन यांचा जन्म वेंर्गुल्यात झाला. तेव्हा गाववालीचा नवरा म्हणून तरी ….. ‘
‘आणि काय रे बबन, डॉक्युमेंटरी साठी पैसा कुठून आणलास?’
‘ओ! दॅट्स इझी!’ बबन आणखी कुणाला वेठीला धरतोय हे जाणण्याची उत्सुकता होतीय. दहा वर्षांपुर्वी मी दिल्लीला कॉनर्फरन्सला गेलो होतो.’
‘आदिवासींवरच असेल.’
‘हो! तर येतांना प्लेनमध्ये माझ्या शेजारी टाटा बसलेले! आमच्या खूप गप्पा झाल्या. मी त्यांच्यावर इतकं इंप्रेशन पाडल की, सांतांक्रुझ विमानतळावर उतरल्यावर माझ्या खांदयावर हात ठेऊन ते म्हणाले,’ तरुण माणसा, जेव्हा तुझ्याकडे एखाद प्राजेक्ट असेल तेव्हा सरळ माझ्या केबीनमध्ये ये! तुला कसलीही मदत करीन मी!’
‘दहा वर्षांनंतर ओळखतील ते तुला’
‘तर! नाही ओळखलस् तर पालखीवालांना सांगतो. ते घालून देतील गाठ ‘
‘पण पालखीवाले तर अमेरिकेला गेले’
‘त्यात काय झाल ? इथून पत्र लिहीन त्यांना’
‘मग काट्रर साहेबांची भेट तू त्यांच्या ओळखीन का नाही घेत?’
‘अरे हो खरच् की! हे लक्षातच आलं नाही माझ्या ! ठीक आहे भेटू पुन्हा! तुर्त बिझी आहे.’

तर थोरामोठयांशी लगट करण्याची बन दबडघावची सवय तशी जुनीच! बबनला तसं कुठलच क्षेत्र वर्ज नाही. राजकारण, समाजकारण, साहीत्यकारण कोणताही प्रांत असो बबन बेदिक्कत आत घुसतो आणि बडयांचय असलेल्या किंवा नसलेल्या दाढीला हात लावतो. आता ही बडी मंडळी बबनचा हात दाढीपर्यंत पोहचू देतात की नाही हा किरकोळ प्रश्न!
माग एकदा बबनने नाटक लिहलं होतं. बबनच नाटयक्षेत्रात शिरण म्हणजे एखादया मस्तवाल खोंडाने काचसामानाच्या दुकानात शिरण्यासारख ! समस्त आदिवासीजनांच्या कल्याणाचा वसा बबननं घेतला असल्याने ते त्याचं नाटकही आदिवासींच्या व्यथा उकलून दाखवणांर, त्यांच्या जखमांवरील खपल्या काढणार्, ह्रुदयद्रावक ह्रदय, पीळवटक वैगरे होतं. हे नाटक त्यांन हातावेगळं केलं. आणि त्यानंतरच्या एक-दोन वर्षात त्यांनं मराठी रंगभुमीच्या कज्वयावत निर्माता-दिग्दर्शकांची यादी माझ्यापुढं उलगडली! ज्या ज्या वेळी तो मला आडवा जाई, तेव्हा तेव्हा थांबून प्रेषिताच्या आवाजात तो जाहीर करी ‘ केयुर नाटक दामूकडे पडलय्’
‘दामू’ मी त्या क्षेत्रात अगदिच अनभिज्ञ
‘दामू म्हणजे दामू केंकरे! तुझ्यासारख्यांना तो दामोदरपंत असेल. मला दामूच.’
‘असो, असो! मग?’ बसवणार आहेत का ते नाटक दामोदरपंत?’
‘बघू नाहीतर देऊन टाकीन विजयाबाईंकडे’
‘विजयाबाई?’
‘विजया मेहता रे ‘
पंधरा दिवसांनी पुन्हा आडवा गेला. मी तोंड चुकवून घाई घाईनं जाणार तोच त्यांन मला हटकलं. एवढया उत्साहानं की मला मुकाटयांन शरण जाव लागल!.
‘केऊर टाळी दे.’
‘का रे बाबा? विजयाबाईंनी नाटक बसवायला घेतल की काय?’
‘छे रे ! त्या चालल्यात पश्चिम जर्मनीला! आ. एन. टी. संस्था एकसारखी माझ्यामागं लागलीय.’
‘मग देऊन टो आय. एन. टी ला!’
‘पण मामा हट्ट करुन बसलेयत ना! ते म्हणतात, मीच बसवणार ते नाटक. बेहद्द खुश आहेत नाटकावर.’
‘अरे वा! तुझे मामा नाटक बसवणार का?’
‘कैथूर, तु म्हणजे अगदी हा आहेस बघ! अरे, मामा म्हणजे माझे मामा नव्हेत! ते बिचारे जन्ममृत्यृ नोंदणी कार्यालयात आहेत! मामा म्हणजे मधुकर तोरडमल.’
अस वर्ष दोन वर्ष बबनच नाटक एका दिग्दर्शकाकडून दुस-या दिग्दर्शकाकडे फिरत राहील. बहुधा कुणासही ते पेलेलं नसाव! एक दिवस बबन भेटला. उत्सुकता म्हणून नव्हे, पण त्याला बरं वाटाव म्हणून अगत्यांन मी विचारल, ‘काय बबन, नाटकाच काय झाल? केव्हा येतंय रंगभुमीवर?’
त्यानं शांतपणे खांदे उडवले. ‘केऊर, आजकाल मराठी रंगभूमीवर वाईट दिवस आलेयत!
नाटकं चालतात कुठे?’
माझी मान हलवून त्याच्या विधानाशी सहमत झालो. निवडणुकांची गडबड सुरु होऊन मंत्रीमंडळ स्थापन होईपर्यंत बनची कोण धावाधाव!
निवडणुकीसाठी उभे राहीलेले बहुतेक उमेदवार एक तर बबनचे गाववाले किंवा त्याचे लंगोटीयार दोस्त. सगळया उमेदवारांशी त्याचे जिव्हाळयाचे संबंध. कुणीही निवडून आला तरी बबनला चिंता नाही!. त्या बबनच्या दृष्टीकोनाचा माझ्यासारख्याला मात्र ताप होई.
‘केयूर, एकवीस रुपये काढ. खाशाबा जाधवसाठी.’
‘अरे, पण परवाच तू महादू पाटीलसाठी एकवीस रुपये घेऊन गेलास माझ्याकडून! हे दोघे प्रतिस्पर्धी ना एकामेकांचे?’
‘असतील रे! आपल्याला काय? आपण सा-या जगाचे मित्र ! जो तो आपल्या पुण्याईवर निवडून येतो. आपण केवळ निमीत्त मात्र!.
‘ते खरं रे ! पण या मतदारसंधात आठजण उभे आहेत. तू सगळयांसाठी वर्गणी मागणार की काय माझ्याकडून?’
‘आठ जणांपैकी सहाजण माझे जिगरिदोस्त आहेत. उरलेल्या दोघांची ओळख काढतोय. तावडीतून जातात कुठ?’
निवडणूक झाल्यानंतर मंत्रिमंडळाविषयी अंदाज व्यक्त होत होते. कुणाला घेणार कुणाला वगळणार याविषयी तर्कवितर्क सुरु होते. त्या काळात बबन दबडधाव भेटला. नेहमीप्रमाणे तो बिझी होता. ‘काय बाबा? कसं काय?’
‘जरा कामात आहे! आमया मधूला मंत्रीमंडळात घेतायत् ना?’
‘मधूला? आमच्या मधूला?’
‘मधू दंडवतेला रे! माझ्याबरोबर सेवादलात होता. सज्जन माणूस आहे.’
बबनच सर्टिफिकेट ते. कुणाची बिशाद आहे मधू दंडवतेला वगळायची?’
जार्जलासुध्दा घेतात का पाहासचं!’

‘बबन जार्ज फर्नांडीस तुझ्या ओळखीचे का?’
‘तर! जॉर्जनं आणि मी एका काडीवर सिगरेटी पेटविल्या आहेत!’
‘अस का? मग तुझे ते दोस्त असणार यात काय संशय? ‘ माग विमानतळावर मी माझ्या एका मित्राला निरोप दयायला गेलो होतो तर बबन समोरुन येत होता. ही स्वारी लेक्चर्सची तयारी करते केव्हा, आणि आदिवासी जमातीत ही मिसळमो केव्हा हेच कळेना!
‘बबन, तुझा जनसंपर्क मोठा विलक्षण बुवा! इकडे कुठ तू?’ मी विचारल.
‘सुनिल चालनाय ना ऑस्ट्रेलियाला – त्याला सेंड ऑफ दयायला आलो होतो. ‘
‘ऑस्ट्रेलियात काय लोकेशन शुटींग आहे वाटत ?’ मी भाबडेपणान प्रश्न केला.
‘गृहस्था, सुनिल दत्त नव्हे, संनिल गावस्कर ‘ माझ्या भाबडेपणाची कीव करत बबन बोलता झाला.
‘अच्छा, तोही तुझा दोस्त का?’
‘अरे, आमच्या माधवचा भाच्चा कोण माधव म्हणून विचारु नकोस!’
‘मला वाटलच! माधव म्हणजे माधव मंत्री ! ग्रेट क्रिकेटर ! अशोकही भेटला. त्याला म्हटल ‘
ऑस्ट्रेलियात चाललाय वडिलांचे नाव राख!’
‘वडिलांचं म्हणजे?’
‘विनूच’
‘विनू म्हणजे विनू मंकड ना?’
‘गुड, केऊर, तु हे ओळखलस् म्हणजे ग्रेट बर का!’
‘कसच कसच’
बबनचा ‘महा’ जनसंपर्क कोणत्या पातळीचा आहे याची मला परवाच प्रचीती आली. काही काम होत म्हणून मी त्याला फोन केला. काम झाल्यावर विचारल, ‘ तुर्त कोणत्या कामात बिझी आहेस?’
‘वाचन चालू आहे’
‘काय वाचतो आहेस?’
‘अर्नेस्टच्या कादंब-या वाचायच्या राहील्या होत्या.’
‘अर्नेस्टच्या?’
‘अर्नेस्ट हेमिंग्वेच्या रे’
‘हा हा! तो अर्नेस्ट होय? मला वाटल, आमच्या बर्नाडचा दोस्त !’ मी दडपून देतो ऐसाजे केल?
‘बर्नाड? कोण बर्नाड?’
‘बर्नाड म्हणजें बर्नाड शॉ ! मी शांतपणे म्हटल, बबन माझ्यापेक्षा शांत स्वरात म्हणाला,’ केयूर, बर्नाडला अर्नेस्ट नावाचा एकही दोस्त नव्हता! तुझ्यापेक्षा बर्नाडला मी चांगला ओळखतो. आय मीन – ओळखत होतो.’ अस म्हणून बबननं शांतपणे फोन खाली ठेवला!

– डॉ. सुभाष भेंडे