मुक्तांगण

 

नवचैतन्य भविष्याचे…

srushti nerkar राज्यात दुष्काळग्रस्त परीस्थिती असताना नाशिक जिल्ह्यातील सृष्टी नेरकर या छोट्या संशोधिकेने गरजेपुरते पाणी वापरण्यासाठी एक उपकरण बनवलं. या उपकरणामुळे 80% पाण्याची बचत झाली आहे. काय आहे हे उपकरण…समजून घेऊया तिच्याचकडून…

सृष्टी राज्यातील पाण्याच्या गंभीर समस्येबाबत तूला माहिती कोणी दिली?

बातम्या वर्तमानपत्रे यातून या गंभीर समस्येची जानीव होत होती.

तू हे उपकरण बनवलं यासाठी प्रेरणा कोणी दिली?

तस बघितलं तर पाणी हा सर्वांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा घटक आहे त्यासाठी जर खेड्याकडे लोकांना खूप दूरवर जावे लागते आणि शहरात हेच पाणी काही प्रमाणात वाया जाते. यातूनच कुठेतरी वाटत होते कि हे थांबायला हव.

यासाठी अस तात्कालिक कारण काय घडल कि तुला या विषयावर संशोधन करावे लागले?

एकदा मी बाबांसोबत गाडी धुण्यासाठी गॅरेजमध्ये गेली. एक गाडी धुण्यासाठी पुष्कळ पाणी वाया जातं हे माझ्या लक्षात आलं. गाडी धुण्यासाठीच जर एवढं पाणी वाया गेलं तर आपण प्यायचं काय? असा प्रश्न मला पडला. मग यावर उपाय शोधण्यासाठी मी या नोझल बनविण्यात मग्न झाले.

नक्की हे उपकरण कस काम करत ?

मोटारी आणि जेट इंजिनमध्ये विशिष्ट प्रकारचे इंजिन वापरले जाते. विशिष्ट प्रकारच्या नोझल्समुळे एका थेंबाचे रूपांतर अनेक लहान कणांमध्ये होते. परिणामी हवा आणि पाणी जास्त क्षेत्रफळ व्यापतात. त्यामुळे ८० टक्के पाण्याची बचत होते. सुरुवातीला ८० टक्के पाणी वापरून गाडी धुण्यात यश आलं, नंतर मी संशोधनात वाढ करून अवघे १५ टक्के पाणी वापरून गाडी धुतली.

सृष्टी हे उपकरण बनवत असताना आई बाबा भाऊ यांच्या काय भावना होत्या?

आई नेहमी म्हणायची कि तुला जे आवडत ते नक्की कर पण अभ्यासात कमी पडू नकोस. बाबा महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे शिक्षक आहेत त्यामुळे त्यांनी या संशोधनात सर्वतोपरी मदत केली त्याचप्रमाणे मोठा भाऊ अमेय यालाही संशोधनात मन रमवायला आवडते म्हणून त्याने हि पाठींबा दिला.

हे उपकरण वापरून जर पाण्याचा वापर केला तर साधारणपणे किती पाण्याची बचत होऊ शकेल अस तुला वाटत?

शहरातील २५ टक्के नागरिकांसाठी ३४० लक्ष लिटर पाणी खर्ची होतं. मात्र, या अनोख्या शॉवरने स्नान केल्यास रोज ६३.७५ लिटर पाणी वापरले जाईल. एका दिवसात दोन लिटरची बचत केली जाईल आणि वर्षाला एक लाख लिटरपेक्षा पाणी बचत होईल.

यानंतर या संशोधनाचा पुढचा टप्पा काय असेल?

सध्या तरी या उपकरणाचे स्वामित्त्व हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सृष्टी या नंतर संशोधनासाठी साधारण कोणता विषय निवडणार आहे?

यानंतर मॉल मध्ये ज्याप्रकारे सेन्सर मशीन असतात त्याप्रमाणे सेन्सर शोवर बनविण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून अंघोळीच्या वेळी या शॉवरखाली अंघोळीला आल्यास पाणी सुरु होईल आणि बाजूला झाल्यास पाणी बंद होईल.

सृष्टी या उपकरणातून एक दाखवून दिल आहे कि ठरवलं तर आपण काय करू शकतो… अजून काय सांगशील जनतेला…

मी एवढच सांगेल कि आपल्याला मिळालेला निसर्ग हि फार मोठी देणगी आहे. त्याच्या सानिध्यात राहताना पाण्याचा योग्य वापर करा. निसर्गाची हानी करू नका.

शब्दांकन – वैभव सुरेश कातकाडे