डॉ. अरुण गद्रे (एम. डी.डी.जी.ओ) हे स्त्रीरोगतज्ञ असून त्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावी वीस वर्षे काम केले. आता ते पुणे येथे स्थित असून 'प्रयास,'' पाथफाइंडर ' संस्थेसाठी एड्सवर कार्य करत आहेत. डॉ. गद्रे हे लेखक असून त्यांच्या नावावर 'हितगुज लेकीशी', 'एक होता फेंगाडया', 'घातचक्र', 'विषाणू' अशी बरीच पुस्तके आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार मिळाले आहेत. |